राजस्थान सरकार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि दर्गा समिती यांना बजावली नोटीस
अजमेर (राजस्थान) – येथे अजमेर दर्ग्याच्या आत प्राचीन शिवमंदिर असल्याची महाराणा प्रताप सेनेची याचिका अजमेर दिवाणी न्यायालयाने स्वीकारली. न्यायालयाने राजस्थान सरकार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि दर्गा समिती यांना पक्षकार करून नोटीस बजावली आहे. या वादावर पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार आहे.
दर्ग्यात उत्खनन झाले, तर महादेवच सापडतील ! – महाराणा प्रताप सेनेचे अध्यक्ष राजवर्धन सिंह परमार
महाराणा प्रताप सेनेचे अध्यक्ष राजवर्धन सिंह परमार यांचे म्हणणे आहे की, आज जी जागा अजमेर दर्गा म्हणून ओळखली जाते, ती प्रत्यक्षात सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या अजयमेरू नगरीचा भाग आहे. अजमेर दर्ग्याखाली भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आजही बंद अवस्थेत अस्तित्वात आहे. हा विषय केवळ कागदोपत्री मर्यादित नाही. या मागणीसाठी राजस्थानमध्ये आम्ही सुमारे ७ सहस्र ८०० किलोमीटरची पायी यात्रा केली होती. या प्रवासात १ लाख २५ सहस्र लोकांच्या स्वाक्षर्या संकलित केल्या असून प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. हा प्रश्न कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा आहे. दर्ग्यात उत्खनन झाले, तर महादेवच सापडतील.
सेनेचे अधिवक्ता ए.पी. सिंह यांनी न्यायालयात सांगितले की, महसूल विभागाचे जुने नकाशे आणि शिवलिंगाची जुनी छायाचित्रे त्यांच्या जवळ असून याठिकाणी पूर्वी शतकानुशतके पूजा होत असल्याचे त्यातून स्पष्ट होते.
राजवर्धन सिंह मुख्य याचिकाकर्ता असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट
या दर्ग्याविषयी यापूर्वीही याचिका प्रविष्ट झाली होती; मात्र न्यायालयाने या प्रकरणात राजवर्धन सिंह यांना मुख्य याचिकाकर्ता मानले आहे. याचे कारण म्हणजे वर्ष २०२२ मध्ये त्यांनी या विषयावर राष्ट्रपतींकडे निवेदन सादर केले होते. या विषयावर सर्वप्रथम पुढाकार त्यांनीच घेतल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. आता दर्गा समिती आणि राज्य सरकार यांना न्यायालयात त्यांची बाजू मांडावी लागणार आहे.

कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !