बलूच नेते मीर यार यांची भारताची बाजू घेऊन पाकवर कठोर टीका

नवी देहली – पाकिस्तान स्वतःच एक आतंकवादी देश असून त्याने बलुचिस्तानमध्ये ४० मशिदी उद्ध्वस्त केल्या आहेत. मशिदींवर थेट बाँबफेक करणे, कुराण जाळणे आणि मशिदींच्या प्रमुखांचे अपहरण करणे, असे अमानवीय प्रकार पाकिस्तानी सैन्याने केले आहेत. जो देश स्वतः अल्पसंख्यांकांचा छळ करतो, त्याला दुसर्यांना मानवाधिकारावर प्रवचन देण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत बलूच नेते मीर यार यांनी पाकच्या सरकारवर टीका केली आहे.
🚩 Exposed: Pakistan's Hypocrisy on Mosques & Human Rights🇵🇰🚫
𝐁𝐚𝐥𝐨𝐜𝐡 𝐥𝐞𝐚𝐝𝐞𝐫 @miryar_baloch 𝐬𝐥𝐚𝐦𝐬 𝐓𝐞𝐫𝐫𝐨𝐫𝐢𝐬𝐭 𝐒𝐭𝐚𝐭𝐞 𝐏𝐚𝐤𝐢𝐬𝐭𝐚𝐧 𝐟𝐨𝐫 𝐢𝐭𝐬 𝐝𝐨𝐮𝐛𝐥𝐞 𝐬𝐭𝐚𝐧𝐝𝐚𝐫𝐝𝐬:
👉 40 Mosques destroyed by Pak Army in Balochistan.
👉 Quran burnt… https://t.co/yTxTHbpN8D pic.twitter.com/AL7rUH6zV1— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 19, 2026
भारताने काश्मीरमधील मशिदी आणि मदरसे यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याची प्रक्रिया चालू केल्यावर पाकने यावर टीका केली होती. त्याला विरोध करतांना बलोच यांनी पाकला फटकारत भारताची बाजू घेतली.
The Republic of Balochistan Fully Stands with Bharat’s Principled Position on PoJK
18 January 2026
Pakistan is a Terrorist state and involved in harassing the Hindus, Sikhs, Christians and other minorities.
Pakistan can't lecture Bharat, Balochistan, Afghanistan and others… https://t.co/mvZKO0rurg
— Mir Yar Baloch (@miryar_baloch) January 17, 2026
पाक सैन्याकडून रणगाड्यांद्वारे बाँबफेक करून नागरिकांवर आक्रमण
बलूच नेते मीर यार यांनी ‘एक्स’वर म्हटले की, पाकिस्तानी सैन्याने सर्वांत आधी ‘खान ऑफ कलत’ यांची मशीद लक्ष्य केली होती. पाकिस्तानी रणगाड्यांनी आणि तोफखान्याने नागरिकांवर बाँबफेक केली होती. त्या मशिदीवर आजही मॉर्टर शेलच्या खुणा असून त्या पाकिस्तानच्या क्रौर्याचा आणि इस्लामविरोधी वर्तनाचा जिवंत पुरावा आहेत. पाकिस्तानचे सैन्य धार्मिक आणि जिहादी कट्टरतावाद्यांचा वापर करून हिंदू, शीख, ख्रिस्ती आणि इतर अल्पसंख्यांक यांना घाबरवण्यासाठी शस्त्र म्हणून करते.
संपादकीय भूमिकाअशा पाकला भारतातील मशिदींविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, हे स्पष्ट होते. भारतातील पाकप्रेमी यावर का बोलत नाहीत ? |
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin