मौनी अमावास्येला प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या तटावर वाद

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – मौनी अमावास्येच्या दिवशी येथील त्रिवेणी संगमस्थळी स्नानासाठी निघालेले ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना त्यांच्या रथासह पोलिसांनी संगमाकडे जाण्यापासून रोखले. रथ आणि मिरवणूक मार्गातच थांबवण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. रथ अडवल्यानंतर शंकराचार्यांचे समर्थक साधू-संत आणि पोलीस यांच्यात तीव्र शाब्दिक वाद झाला. शंकराचार्यांनी पोलीस आणि मेळा प्रशासन यांवर मनमानी अन् दडपशाही केल्याचा आरोप केला.
| योगी आदित्यनाथ यांच्या आदेशावरून अपमानाचा झाल्याचा आरोप
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी संगमस्नान करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, आमच्या डोळ्यांसमोर आमच्यासमवेत आलेल्या साधू-संतांना मारहाण करण्यात आली आणि धक्काबुक्की करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशावरून अधिकारी आमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. शंकराचार्य सन्मान आणि अपमान यांच्या पलीकडे असल्याने आम्हाला काही फरक पडत नाही; मात्र साधू-संतांशी झालेली असभ्य वागणूक आणि मारहाण सहन केली जाणार नाही. |
पोलिसांशी झालेल्या वादानंतर मोठ्या संख्येने अधिकारी पोलीस दलासह संगम तटावर पोचले. पोलिसांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना रथातून खाली उतरण्याची अनुमती दिली नाही. पोलिसांनी ५ जणांसह जाऊन स्नान करण्याचे निर्देश दिले. यावर शंकराचार्यांनी आक्षेप घेतला आणि प्रशासनाचा पवित्रा मनमानी असल्याचे सांगितले. या घटनेनंतर संपूर्ण संगम क्षेत्र पोलीस छावणीसारखे बनले. पोलिसांनी २० पेक्षा अधिक साधूंना धक्काबुक्की केल्यावरून कह्यात घेतले. गृह सचिव मोहित गुप्ता, मंडलायुक्त सौम्या अग्रवाल, पोलीस आयुक्त जोगेंद्र कुमार, मेळाधिकारी ऋषिराज यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोचले.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले