विश्व हिंदु परिषदेचा निषेध !

मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबईतील वांद्रे पूर्व प्रभाग क्रमांक ९६ मध्ये सना हाजी हलीम खान या मुसलमान महिलेला नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली. सना खान यांनी निवडणूक प्रचारासाठी ‘जय श्रीराम’ या लोकप्रिय असलेल्या गाण्यातील मूळ शब्दांमध्ये पालट केला. त्यांनी हिंदूंच्या या धार्मिक गाण्यामध्ये स्वतःचे नाव घालून ते प्रचारासाठी वापरले. यामुळे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्षेप नोंदवला.
या गाण्यात ‘हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा…उबाठा जिंदाबाद….पाडा बेहराम का बच्चा, सना हाजी हलीम खान बोलेगा ।’ अशा घोषणा देण्यात आल्या. प्रभु श्रीरामांवर रचलेल्या गीताची खान यांनी विटंबना केली आहे. त्यामुळे हिंदू संतप्त झाले आहेत. या प्रकरणी अद्याप पक्षाने अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
देशविरोधी आणि धर्मविरोधी कृत्याचा निषेध ! – श्रीराज नायर, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषदया प्रकरणी विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. श्रीराज नायर म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केली; पण त्यांच्या पुढील पिढीकडून तुष्टीकरणाचे राजकारण आणि मुसलमानांचा लांगूलचालन केले जात आहे. निवडणुकीसाठी हिंदुत्वाच्या विचारधारेवर पाणी सोडले आहे. या जिहादी प्रवृत्तींनी धार्मिक गाण्याला दूषित करण्याचा आणि त्याची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे. या देशविरोधी आणि धर्मविरोधी कृत्याचा विश्व हिंदु परिषद तीव्र निषेध करते. |
संपादकीय भूमिकाया प्रकरणी सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन गाणे रहित करण्यासाठी उमेदवाराला भाग पाडायला हवे ! |
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !