महिला भाविकांची गर्दी

पंढरपूर – मकरसंक्रांतीच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली असून श्री रुक्मिणीमातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. यात सोनेमुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, जवेच्या माळा, तांबडी चिंचपेटी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, जवमणी पदक, हायकोल, सरी, कंबरकट्टा, लक्ष्मीहार अशा अलंकाराचा समावेश आहे. श्री रुक्मिणीमातेला सुवासिनी महिलांनी नवधान्याचे वाण अर्पण करण्यासाठी गर्दी केली असून सहस्रो महिला भाविक पहाटेपासूनच हळद, कुंकू, तिळगूळ, ऊस, बोर, गाजर, हुरडा यांसह अन्य प्रकारचे धान्य अर्पण करण्यासाठी मंदिरात आल्या आहेत.




मंदिर प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा !
मंदिरातील गाभारा, चारखांबी, नामदेव पायरी येथील भाग सजवले असून ही सजावट श्री. अमोल शेरे, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर विनामूल्य केली आहे. त्यासाठी २ सहस्र शेवंती, १०० गुलाब गड्डी, बेंगलोर शेवंती १० किलो, ऑर्किड १० किलो, ग्रीनरी ३० किलो, कामिनी ३०० किलो, भगवा झेंडू १०० किलो, पिवळा झेंडू १०० किलो, पांढरी शेवंती ५० किलो इत्यादींचा वापर केला आहे. भाविकांची गर्दी विचारात घेऊन जलद दर्शन होण्यासाठी ‘टोकन दर्शन पास बुकिंग’ व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तसेच थेट दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या अल्प करणे, महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक आणि आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.



धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !