थिरूवनंतपूरम् (केरळ) – शबरीमला मंदिरातील सोन्याच्या चोरीनंतर आता तुपाच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी दक्षता पथक स्थापन करण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिला. मंदिरातील नैय्याभिषेकानंतर उरलेल्या आदिया सिष्टम तुपाच्या विक्रीतून ३५ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. न्यायालयाने शबरीमलाचे विशेष आयुक्त यांना चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
१. न्यायालयाने सांगितले की, १७ नोव्हेंबर २०२५ ते २६ डिसेंबर २०२५ आणि २७ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत झालेला गैरव्यवहार सुमारे ३५ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. न्यायालयाने दक्षता संचालकांना सक्षम अधिकार्यांचे पथक सिद्ध करण्याचे आणि मुख्य दक्षता अन् सुरक्षा अधिकारी यांच्या अहवालाच्या आधारे गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. दक्षता पथकाला १ महिन्याच्या आत प्रगती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
२. चौकशीत असे आढळले की, मारमठ इमारतीतील विक्री केंद्रावरून १६ सहस्र ६२८ पाकिटांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम त्रावणकोर देवस्वम् बोर्डाच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही. प्रत्येक पाकिटामध्ये १०० मिलीलीटर तूप होते आणि ते भक्तांना १०० रुपयांना विकले जात होते. चौकशीत असेही समोर आले की, एकूण ३ लाख ५२ सहस्र ५० पाकिटे सिद्ध करण्यात आली होती. त्यांपैकी अनुमाने ८९ सहस्र ३०० पाकिटे विक्री केंद्रावरून विकली गेली; मात्र कर्मचार्यांनी केवळ ७५ सहस्र ४५० पाकिटांची रक्कम जमा केली. त्यामुळे १३ सहस्र ६७९ पाकिटांची रक्कम म्हणजे सुमारे १३ लाख ६८ सहस्र रुपये जमा झाले नाहीत.
३. बोर्डाने सांगितले की, देवस्वम् कर्मचारी सुनील कुमार पोत्ती यांनी भक्तांना तुपाच्या विक्रीच्या पावत्या दिल्या नव्हत्या. २४ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ६८ सहस्र २०० रुपये जमा झाले नाहीत आणि तब्बल १७ दिवसांनंतर आदेश मिळाल्यावर ती रक्कम जमा करण्यात आली. या प्रकरणानंतर सुनील कुमार पोत्ती यांना निलंबित करण्यात आले असून पुढील शिस्तभंग कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !