
सातारा, १२ जानेवारी (वार्ता.) – स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. संमेलनातील स्वागतकमानी, प्रदर्शन, सज्जे इत्यादी सजावटीसाठी २० लाख रुपयांचे लोखंडी साहित्य खरेदी करण्यात आले होते; मात्र साहित्य संमेलन झाल्यानंतर हेच लोखंडी साहित्य अवघ्या २ लाख ३७ सहस्र रुपयांमध्ये भंगारात विकण्यात आले आहे.
संमेलनस्थळावरून ४ टेंपो भरून नेण्यात आलेले लोखंडी भंगाराचे वजन ७.९० टन एवढे भरले. मुंबई येथील एका कंत्राटदाराच्या वतीने हे काम करण्यात आले असून भंगारात घातलेल्या एका किलोला ३० रुपये दर देण्यात आला असल्याचे तेथील कामगारांकडून समजले. साहित्य संमेलनासाठी करण्यात आलेल्या सजावटीसाठी लोखंडी साहित्याच्या दुप्पट मजुरी दिल्याची चर्चा आहे. साहित्य संमेलनाचा मंडप उभारणे आणि सजावट यांचे काम साहित्य संमेलनाच्या आधी १५ दिवस चालू होते.
संपादकीय भूमिकासाहित्य संमेलनातून भारताची आर्थिक प्रगती आणि विकास यांवर खोचक टीका करणारे गिरीश कुबेर संमेलनाच्या आयोजनातील आर्थिक काटकसरीविषयीही काही भाष्य करतील का ? |
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत