
मुंबई, ९ जानेवारी (वार्ता.) – शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थानमधील श्री साई प्रसादालयाचे आचारी राष्ट्रपती भवनातील आचार्यांना महाराष्ट्रीय पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देत आहेत. वर्ष २०२३ ते २०२५ असे सलग ३ वर्षे श्री साई प्रसादालयातील २ आचारी वर्षातील काही दिवस प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये जात आहेत.
भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जुलै २०२३ मध्ये शिर्डी येथे श्री साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी श्री साई प्रसादालयातील भोजनप्रसादाचा लाभ घेतला. त्या वेळी त्यांना भोजनप्रसाद आवडला. त्यामुळे ऑगस्ट २०२३ मध्ये २६ दिवसांकरता रवींद्र वहाडणे आणि प्रल्हाद कर्डीले या आचार्यांना राष्ट्रपती भवनातील आचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये १८ दिवस, तसेच जानेवारी २०२५ मध्येही २३ दिवस श्री साई प्रसादालयातील आचार्यांना राष्ट्रपती भवनामध्ये महाराष्ट्रीय पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक