
मुंबई, ८ जानेवारी (वार्ता.) – बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे राज्यात अनेकांनी मोठ्या प्रमाणात शासकीय नोकर्या प्राप्त केल्याचा गंभीर प्रकार साधारण वर्ष २०१८ च्या कालावधीत उघड झाला होता. मंत्रालय, राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आदी महत्त्वाच्या कार्यालयांसह अन्य शासकीय कार्यालयांतही बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्त्या झाल्या. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची मोठी नाचक्की झाली. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ या प्रणालीचा उपयोग करण्याचा महत्त्वाचा निर्णय क्रीडा विभागाने ८ जानेवारी या दिवशी निर्गमित केला.
शासनाने मान्यता दिलेल्या खेळांमध्ये राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय अन् निमशासकीय नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण असते. याचा अपलाभ घेऊन राज्यातील काही क्रीडा संघटनांकडून पैसे घेऊन बनावट क्रीडा प्रमाणपत्रे वितरीत करण्याचे प्रकार घडले होते. क्रीडा प्रमाणपत्र पडताळण्याच्या प्रक्रियेतील मनुष्याचा सहभाग अल्प केला असून ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. क्रीडा स्पर्धा पार पडल्यानंतर पुढील ७ दिवसांत स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची नावे ‘क्रीडा ई-प्रमाण पोर्टल’वर अपलोड करावी लागणार आहेत.
बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्त उमेदवार !
सध्या महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण, तसेच मुंबई उच्च न्यायालय यांमध्ये बनावट क्रीडा प्रमाणपत्राविषयीचे न्यायालयीन खटले चालू आहेत. हे खटले लढवण्यासाठी त्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या विविध खात्यांमधील मनुष्यबळ, वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात व्यय होत आहे. |
| कोणत्याही ठिकाणचा घोटाळा टाळण्यासाठी प्रणालीचा उपयोग करण्यासमवेत व्यक्तींवर संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! |

राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !