
रत्नागिरी, ७ जानेवारी (वार्ता.) – ‘महिला पतंजलि योग समिती, रत्नागिरी’च्या वतीने ८ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आदरणीय सौ. रमा जोग, सौ. नीता साने, सौ. तेजस्विनी मोरे आणि श्री. प्रेमनाथ नागवेकर हे योगाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
शहरातील गणेश मंदिर, आर्.टी.ओ. रस्ता, कुवारबाव, रत्नागिरी येथे हे शिबिर होणार असून शिबिराची वेळ दुपारी ४ ते सायंकाळी ६ अशी आहे. ‘शिबिराला येतांना सर्वांनी ‘मॅट’, पाण्याची बाटली समवेत घेऊन यावी’, अशी सूचना आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. ‘या शिबिराचा लाभ सर्व वयोगटातील स्त्री, पुरुष, मुले अशा सर्वांनी घ्यावा’, असे आवाहन महिला पतंजलि योग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित