‘स्त्री चळवळीची ५० वर्षे : मागे वळून पहातांना’ परिसंवादातील सूर

सातारा, ६ जानेवारी (वार्ता.) – स्त्री चळवळ ही केवळ स्त्रियांची किंवा पुरुषांविरुद्धची चळवळ नाही. सर्व शोषितांची पुरुषसत्ताक विरुद्ध चळवळ आहे. एकमेकांच्या सहकार्याने, समन्वयाने चांगला माणूस घडवण्याची ही चळवळ आहे. स्त्रीने पालटतांना स्वतःच्या दृष्टीकोनात केलेला पालट हाच महत्त्वाचा भाग आहे. स्त्री चळवळ ही स्त्री आणि पुरुष या दोघांचाही सहप्रवास आहे, असा सूर परिसंवादात उमटला.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘स्त्री चळवळीची ५० वर्षे मागे वळून पहातांना’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी परिसंवादामध्ये डॉ. गीताली, सुचिता खल्लाळ, प्रमोद मुनघाटे, डॉ. सविता मोहिते, डॉ. गायत्री शिरोळे, डॉ. संध्या आणवेकर साहित्यिक सहभागी झाले होते.
डॉ. सविता मोहिते म्हणाल्या, ‘‘स्त्री स्वतःला सिद्ध करायला घराबाहेर पडते. तिला घर सांभाळणेही अनिवार्य असते. सतत सामाजिक दडपणात वावरत असते. स्त्रीही माणूस आहे. याविषयी संवेदनशीलता निर्माण करण्याचे काम चळवळीने केले आहे. जुन्या शस्त्राने नव्या लढाया लढता येणार नाहीत. यासाठी काळानुरूप पालट आवश्यक आहेत.’’
गायत्री शिरोळे म्हणाल्या, ‘‘सायबर क्राईम समाजामध्ये डिजिटल जगातही स्त्री चळवळ काळाची आवश्यकता आहे.’’
डॉ. गीताली म्हणाल्या, ‘‘स्त्री चळवळ ही एकमेव अशी चळवळ आहे की, जी घरात आणि घराबाहेर लढली जाते. स्त्रियांच्या प्रश्नांविषयी पालट घडवतांना व्यक्ती आणि व्यवस्थेत पालट घडवणे आवश्यक आहे.’’
नमिता कीर म्हणाल्या, ‘‘राजकारणात स्त्रियांचा खरा प्रवेश आरक्षणातून झाला आहे. हे मोठे परिवर्तन चळवळीने दिले आहे. प्रशिक्षित होईपर्यंत स्त्रियांच्या अडून पुरुषच सत्ता करत होते. महिलेला बोलण्याची हिंमत आली, तेव्हा ती धीट झाली आणि मग हळूहळू परिस्थिती पालटू लागली.’’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !