|

मुंबई – पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व येथील होली फॅमिली कॉन्व्हेंट शाळेच्या ३१ डिसेंबर या दिवशी झालेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी येशूच्या स्पर्शाने आंधळा बरा होणे, लंगडा चालणे आदी असाध्य आजार बरे करणारे चमत्कारांचे नाट्यमय प्रदर्शन केले. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या माध्यमातून हिंदु मुलांच्या कोवळ्या मनावर खोटे चमत्कार बिंबवून धर्मांतराचे विघटनकारी षड्यंत्र चालवले जात आहे. शिक्षण हे विवेक जागृत करणारे असावेत; चमत्कार, अंधश्रद्धा पसरवणारे नाही. प्रशासनाने तातडीने या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. हिंदु जनजागृती समितीने यावर तात्काळ कारवाईसाठी वसई-विरार पोलीस ठाण्याचे उपायुक्त, माणिकपूर पीआय आणि परिमंडळ २ चे उपायुक्त यांना प्रत्यक्ष निवेदन दिले आहे.
या संदर्भातील निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे. या वेळी निवेदन देतांना समितीचे विलास निकम, प्रशांत पाटील, अतुल मेहता, संदीप तुळसकर आणि जामकर हे उपस्थित होते.
| या संदर्भात शाळा प्रशासनाची चौकशी करावी, शिक्षण आणि मुख्याध्यापक यांचे निलंबन करावे, गुन्हा नोंद करावा आणि सर्व शाळांसाठी मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशा मागण्याही या पत्रकात हिंदु जनजागृती समितीने केल्या आहेत. |
समितीने दिलेल्या या तक्रारीत म्हटले आहे की, ‘https:/youtu.be/0Qp2Q7Yv7ik’ या व्हिडिओवरून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. हे अवैज्ञानिक प्रदर्शन महाराष्ट्र ‘जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३’ च्या कलम ३ अंतर्गत दंडनीय आहे, ज्यात तथाकथित चमत्कारांचा प्रचार समाविष्ट आहे. शाळेत अंधश्रद्धा पसरवून मुलांच्या कोवळ्या मनावर अवैज्ञानिक धारणा बिंबवल्या जातात, ज्यामुळे मानसिक विकास बाधित होतो आणि शैक्षणिक परिसरात खोट्या चमत्कारांच्या माध्यमातून प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून येशूविषयी विद्यार्थ्यांमध्ये खोटी प्रतिमा निर्माण करून विद्यार्थ्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे षड्यंत्र उघडपणे दिसत आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !