
१. आईचे निधन झाल्यावर गोवा येथे घरी न जाता प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासंबंधित सेवेला प्राधान्य देणे
‘२५.१.२०२५ या दिवशी श्री. गुरुराज प्रभु (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४९ वर्षे) यांच्या आईचे (श्रीमती भारती प्रभु, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८७ वर्षे यांचे) मडगाव (गोवा) येथे निधन झाले. त्या वेळी श्री. गुरुराज आणि त्यांची पत्नी सौ. श्रेया प्रभु (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४८ वर्षे) प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासंबंधित महत्त्वाच्या सेवेत सहभागी होते, तसेच कुंभमेळ्याचा महत्त्वाचा कालावधी चालू होता. सर्वसाधारणपणे ‘त्या दोघांना गोव्याला घरी जावे लागेल’, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या दोघांनी ‘निधन झालेल्या आईसाठी सेवा सोडून गोव्यात घरी जायचे कि नाही ?’, याविषयी चर्चा केली, तसेच ते गोवा येथील त्यांच्या कुटुंबियांशी बोलले. त्यानंतर त्यांनी घरी न जाता कुंभमेळ्यासंबंधित सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबियांचे कौतुकच आहे की, त्यांनी अपेक्षा न ठेवता परिस्थिती सांभाळून घेतली आणि दोघांना संपूर्ण सहकार्य केले.

२. कुंभमेळ्यानंतरही सेवेलाच महत्त्व देणे आणि ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’शी संबंधित सेवेसाठी गोवा येथे जाणे
मार्च २०२५ मध्ये कुंभमेळा संपल्यावर श्री. गुरुराज आणि त्यांची पत्नी सौ. श्रेया यांनी घरी जाण्याचे ठरवले होते; पण त्यांना कुंभमेळ्यानंतरच्या पुष्कळ सेवा पूर्ण करायच्या होत्या. त्यामुळे त्या दोघांनी सेवेच्या दायित्वाची जाणीव ठेवून घरी न जाता पुन्हा सेवेलाच प्राधान्य दिले. श्री. गुरुराज गोव्याला थेट एप्रिल मासात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या सेवेसाठी गेले. तेथे त्यांनी महोत्सवाच्या मंडप उभारणीच्या सेवेत महत्त्वाची भूमिका निभावली, तसेच सौ. श्रेया महोत्सवाच्या आदल्या दिवशी गोव्याला आल्या आणि त्यांनी महोत्सवात सेवा केली.
अशा प्रकारे उभयतांनी ‘गुरुकार्यासाठी त्याग कसा करावा ?’, याचे आदर्श उदाहरण सर्व साधकांसमोर ठेवले आहे. ‘गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला श्री. गुरुराज आणि सौ. श्रेया यांच्यासारखी साधकरत्ने मिळाली आहेत’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे.’
– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती, वाराणसी. (१०.६.२०२५)
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !