|

टोरंटो (कॅनडा) – केरळमधील पाद्री जेम्स चेरिकल याला अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात कॅनडामध्ये अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर टोरंटो येथील आर्चडायसिस संस्थेने पाद्री जेम्स चेरिकल याला पदावरून हटवले आहे. चेरिकल याच्या अटकेनंतर सेंट जेरोम चर्चने २५ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत होणार्या प्रार्थनासभांचा कार्यक्रम रहित केला आहे. ( असे वासनांध ख्रिस्ती पाद्री त्यांच्या ख्रिस्ती बांधवांना धर्म आणि नीतीमत्ता यांचे शिक्षण काय देणार ? – संपादक)
🚨 60-yr-old priest Fr James Cherickal, originally from Kerala, arrested in Canada for sexually assaulting minor girls.
He served the Roman Catholic Archdiocese of Toronto for ~30 years and was posted at St. Jerome’s Church last year.
Across the world, such crimes by priests… pic.twitter.com/F4c1P4rh2y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 31, 2025
१. ६० वर्षीय पाद्री जेम्स चेरिकल हा ३० वर्षांपासून टोरंटो ‘आर्चडायसिस’च्या अंतर्गत विविध भागांत सेवा बजावत होता. वर्षभरापूर्वी त्याची सेंट जेरोम चर्चमध्ये नियुक्ती झाली होती.
२. केरळमधून स्थलांतरित झालेल्या कॅथॉलिक बांधवांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सिरो-मालाबार चर्चध्येही त्याने सेवा बजावली आहे.
३. कॅनडाला जाण्यापूर्वी जेम्स चेरिकल याने केरळच्या थामरस्सेरी कॅथॉलिक चर्चमध्ये सेवा बजावली होती.
संपादकीय भूमिकाजगभरात पाद्र्यांच्या अनाचारी कारावाया उघड होत आहेत. ‘प्रेम आणि संदेश यांचा संदेश देणारे जगभरातील बहुतांश पाद्री हे समाजासाठी धोकादायक आहेत’, असे कुणी म्हटल्यास त्यात चूक ते काय ? |
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !