कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी व्हिडिओद्वारे उघड केल्याचे प्रकरण

कोल्हापूर – येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड करतांना राहुल चतुर्वेदी यांनी कमरेला बंदूक लावून श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात २९ डिसेंबरला दुपारी २.३० वाजता प्रवेश केला होता. याप्रसंगी त्यांच्या समवेत हिंदुत्वनिष्ठ श्री. संभाजी (बंडा) साळुंखे उपस्थित होते. सध्या जिल्ह्यात ३७ (१) अ ते फ कलम लागू आहेत, त्याचा भंग झाल्याने या दोघांविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, ३(५) भारतीय शस्र अधिनियम कलम ३ अन् २५ प्रमाणे, तसेच धार्मिक संस्था (दुरुपयोग प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यावर हिंदुत्वनिष्ठ श्री. संभाजी (बंडा) साळुंखे यांना अटक करण्यात आली, तसेच नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
🚨 Temple Security Exposed 🚨
Devout Hindu Sambhaji (Banda) Salunkhe was arrested & later released after exposing serious security lapses at Shri Mahalakshmi Devi Temple, Kolhapur.
He entered the temple with a gun to prove how vulnerable the system is.
⚠️ Question remains:… pic.twitter.com/Ahr1Uk3juW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 31, 2025
प्रकरणामागील उद्देश समजून घेणे महत्त्वाचे ! – अधिवक्ता उदय पाटील
या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ श्री. संभाजी (बंडा) साळुंखे यांची बाजू न्यायालयात मांडणारे अधिवक्ता उदय पाटील यांनी ‘दैनिक सनातन प्रभात’शी बोलतांना सांगितले की, त्यांच्या कृतीमागील उद्देश समजून घेणे महत्त्वाचे आहे. पोलीस ‘सुरक्षा यंत्रणा वेठीस धरली’, असे सांगत आहेत; प्रत्यक्षात या दोघांचा उद्देश हा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी उघड करणे, हा होता. या दोघांनी या त्रुटी उघड केल्यामुळे खरी वस्तूस्थिती उघड झाली. सदरच्या त्रुटी उघड केल्यानंतर हे दोघेही कुठे पळून गेले नाहीत. सुरक्षा यंत्रणांमधील त्रुटी उघड करणार्यांवर जर पोलीस गुन्हे नोंद करू लागले, तर यापुढील कालावधीत कुणीच अशा त्रुटी दाखवणार नाही. या प्रकारामुळे खरे तर प्रशासन जागे झाले असून भविष्यात होणारा अनर्थ टळला आहे. त्यामुळे संभाजी साळुंखे यांना अटक करणे चुकीचे आहे, अशी सूत्रे आम्ही न्यायालयात मांडली.
सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड करण्यासाठी राहुल चतुर्वेदी यांचा बंदुकीसह श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात प्रवेश !साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेवर परत एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंदिराच्या चारही द्वारांवर धातूशोधक यंत्र (मेटर डिटेक्टर) बसवण्यात आले आहेत. असे असतांना राहुल चतुर्वेदी यांनी कमरेला बंदूक लावून मंदिराच्या एका द्वारातून आत प्रवेश केला. त्या वेळी त्यांना कोणत्याही सुरक्षा रक्षकाने अडवले नाही, तसेच कोणत्याही पोलिसानेही अडवले नाही, तसेच त्यांची अंगझडतीही घेण्यात आली नाही. या घटनेचा व्हिडिओ त्यांनीच ध्वनीचित्रीत करून सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्यावर ही घटना समोर आली आहे. |
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी