
अकोले (जिल्हा अहिल्यानगर) – अवैध देशी मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी सुनील तोरमल, वैभव नवले आणि बबलू गुडेप यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. या कारवाईत ४२ सहस्र ३६० रुपयांचे देशी मद्य आणि ५ लाख रुपये मूल्याची चारचाकी गाडी असा ५ लाख ४२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे उदाहरण ! – संपादक)
एका पांढर्या रंगाच्या विनाक्रमांकाची गाडी राजूर हद्दीतून मद्य वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संशयित वाहन अडवले. त्यात देशी मद्याची ११ खोकी सापडली. गाडीचालकाने ‘ही गाडी वैभव यांची असून त्यांनी सांगितले; म्हणून मी संगमनेर येथील बबलू यांच्या दुकानातून माल घेऊन खडकी येथे देणार होतो’, असे सांगितले.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !