
सनातन राष्ट्र शंखनाद अनुभवला ।
धर्मचिंतना वेग लाभला ।। १ ।।

धर्मपरिचय निःसंशय दिला ।
‘सनातन’ शब्द आज विस्तारला ।। २ ।।
धर्मकार्याच्या क्षितिजावर धर्मसूर्य झळाळे
अधर्माचा अंधकार जगीचा जाळे ।। ३ ।।
धर्मविरांना बळ अखंड पुरवतसे ।
संघर्ष करण्या सदैव साथ देतसे ।। ४ ।।
देव, देश अन् धर्म यांचे रक्षण करण्या अवतरला ।
साधना सांगण्या पहा आसुसला ।। ५ ।।
आत्मभान जागवतसे अन् अंतर्मुख करतसे
गुरुवचने (टीप) दशदिशा प्रसारितसे ।। ६ ।।
शंखनाद आज अनुभवला ।
धर्मद्रोही विचार करू लागला ।। ७ ।।
टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची वचने
– श्री. विनायक मोहन ठिगळे, वडूज, सातारा. (१७.११.२०२५)
सनातन राष्ट्र निर्माण हेतु हो रहा शंखनाद है ।
चला ! शौर्य, भक्ती आणि हिंदु राष्ट्र यांचा संकल्प करू रामनवमीला !!
हिंदु राष्ट्राची गुढी उभारू उंच उंच आकाशी ।
सण हा आनंदाचा । ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ची आरोळी देण्याचा ।
सनातन श्वास माझा, प्राण सनातन ।
रामाच्या गावाला जाऊया ।