मौलाना अताउर रहमान बिक्रमपुरी याचा आरोप

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात मौलाना अताउर रहमान बिक्रमपुरी याने चिथावणीखोर विधाने केल्यावरून अटक होण्यापूर्वी फेसबुकवरून एक व्हिडिओ प्रसारित केला. यात त्याने दावा केला आहे की, ‘नॅशनल सिटिझन पार्टी (एन्सीपी) आणि जमात-ए-इस्लामी यांचे काही नेते आतंकवादी कारवायांत सहभागी आहेत. या दोन्ही पक्षांतील काही नेत्यांचा बांगलादेशात अस्थिरता निर्माण करण्यात सहभाग आहे.’ रहमान याने एन्सीपीशी संबंधित विद्यार्थी नेत्यांवर देशात अलीकडे झालेल्या हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप केला.
वर्ष २०२१ मध्ये अताउर रहमान याला बंदी घालण्यात आलेल्या ‘अंसारुल्लाह बांग्ला टीम’ या आतंकवादी संघटनेचा सदस्य म्हणून अटक करण्यात आली होती. तो अनेक वेळा ‘तौहीदी जनता’ या नावाने चालू झालेल्या आंदोलनांत सहभागी झाला होता. अताउर रहमान ‘अँटी शतीम मूव्हमेंट’ नावाचे एक फेसबुक पानही चालवतो.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !