१३ ते १५ डिसेंबर या कालावधीमध्ये देहली येथील भारत मंडपम् येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आणि राष्ट्र-धर्म जागृतीविषयीचे प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाविषयी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
गुरूंचे कार्य आणि कीर्ती दिगंत झाली !

केंद्रीयमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार यांसारख्या लोकप्रतिनिधींनी मुक्तकंठाने व्यासपिठावरून सनातन संस्थेचा गौरव केला. ‘गुरूंचे कार्य आणि कीर्ती दिगंत होत आहे’, असे वाटून अनेकदा माझी भावजागृती झाली.
– सद्गुरु नीलेश सिंगबाळ
१. हिंदुत्वनिष्ठांचा महोत्सवातील सहभाग हे दैवी नियोजन !
‘देशाच्या राजधानीमध्ये हे आयोजन भव्य स्वरूपात होणे, तसेच १३ आणि १४ डिसेंबर असे दोन्ही दिवस सभागृहात मोठ्या संख्येने धर्मनिष्ठ, राजकारणी, अधिवक्ता, उद्योगपती उपस्थित असणे अन् त्यांचा महोत्सवातील सहभाग हे एक दैवी नियोजन होते’, असे मला वाटले.
२. संपूर्ण जगाला संस्कृती आणि शौर्य यांचे दर्शन !
‘महोत्सवात झालेली उद्बोधन आणि चर्चा यांची विविध सत्रे, तसेच शौर्य, संस्कृती यांच्या प्रदर्शनातून संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती अन् शौर्यशाली इतिहास यांचे दर्शन घडले’, असे मला वाटले.
३. प्रेरणा देणारे राष्ट्र-धर्म विषयावरील प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला !
१५ डिसेंबर या दिवशी २ शाळांमधील विद्यार्थी प्रदर्शन पहाण्यासाठी आले होते. प्रदर्शन पाहून त्यांचा उत्साह वाढला. विद्यार्थ्यांनी भारताचा खरा इतिहास आणि पूर्वीच्या काळातील न्याय, विज्ञान आणि राष्ट्रपुरुष यांचे शौर्य प्रदर्शनात पाहिल्याने राष्ट्र-धर्म रक्षणासाठी त्याग अन् निष्ठा यांविषयी त्यांचे प्रबोधन झाले. ‘या प्रदर्शनातून प्रेरणा मिळाली’, अशी भावना विद्यार्थी आणि त्यांच्या समवेत आलेले शिक्षक यांनी व्यक्त केली.
४. धर्मनिष्ठांनी त्यांच्या क्षेत्रात महोत्सवाच्या आयोजनाची इच्छा प्रकट करणे
महोत्सवाच्या आयोजनातून अनेक धर्मनिष्ठांच्या मनात राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याची ऊर्जा निर्माण झाल्याचे त्यांनी व्यक्तही केले. ‘असे आयोजन आमच्या क्षेत्रातही व्हायला हवे’, असा विचार काही जणांनी व्यक्त केला.
५. एक विचार, एक ध्येय आणि संघटित शक्ती यांचा अपूर्व संगम म्हणजे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !
ईश्वर किंवा गुरु यांचे कार्य त्यांच्या संकल्पाने कसे होते ? याची प्रत्यक्ष अनुभूती महोत्सवातून आली. गुरुसेवेची अपूर्व प्रेरणा आणि सेवारत साधकांनी भावपूर्णपणे अन् दिवस-रात्र एक करून सेवा केली. सेवा करतांना एक विचार, एक ध्येय आणि संघटित शक्ती यांचा अपूर्व संगमही सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात अनुभवायला मिळाला.’
– सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती.
प्रत्येक धर्मनिष्ठाच्या मुखावर समाधान आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा आत्मविश्वास !

महोत्सवाच्या कालावधीत अनेकांशी माझी भेट झाली. प्रत्येक धर्मनिष्ठाच्या मुखावर महोत्सवाला येऊन सार्थक झाल्याचे समाधान आणि येणार्या काळात सनातन म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची निश्चिती अन् आत्मविश्वास जाणवला.
– सद्गुरु नीलेश सिंगबाळ
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !