|

मुंबई : शिवडी येथे चालू असलेल्या ‘सनबर्न म्युझिक फेस्टिवल’मध्ये ४० सहस्र लोकांसाठी उघड्या जागेवर मद्यसेवनास अनुमती कशी दिली ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. ‘राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखू शकते’, असे महाअधिवक्ता मिलिंद साठे यांनी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपिठाला सांगितले. ‘१ सहस्र लोक मद्यधुंद अवस्थेत असतील, तर २०० पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ? आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करायचे आहेत; उपचारात्मक नाहीत. काहीही घडू शकते. लोक मद्यधुंद अवस्थेत उघड्यावर फिरू शकत नाहीत. त्यांच्यासाठी वेगळा कायदा असावा का? राज्याच्या मद्यधोरणाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे’, असेही न्यायालयाने सांगितले.
🚨 40,000+ Crowd | Liquor at Sunburn Festival Under HC Scanner 🚨
• Bombay High Court questions Maharashtra govt’s nod for liquor sales
• HC: “We’ll lay down the law. Liquor licences can’t be run like this.”
• Open-air event, massive crowd → serious safety & law-order… pic.twitter.com/jc5RCMfhzk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 20, 2025
१. ‘ही याचिका आम्ही निकाली काढणार नाही. अशी दुसरी याचिका कधी प्रविष्ट (दाखल) होईल, हे ठाऊक नाही. त्यामुळे ही संधी आहे. आम्ही आता कायदा स्पष्ट करू. तुम्ही अशा पद्धतीने मद्य परवाना देऊ शकत नाही’, असे न्यायालयाने म्हटले.
२. ‘हा कार्यक्रम उघड्या जागेत होत आहे. काही अनुचित प्रकार घडणार नाही, याची निश्चिती कशी करणार? एखादी व्यक्ती मद्यधुंद आहे कि नाही, हे कसे ओळखणार? सहस्रो लोकांच्या गर्दीत शरिराला स्पर्श होणार नाही, हे कसे निश्चित करणार?’, असे प्रश्न न्यायालयाने आयोजकांना केले.
हे ही वाचा → Banish SUNBURN : ‘सनबर्न’च्या नशेखोरीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ शोधा !
आयोजकांकडून कार्यक्रमातील सिद्धतेचा आढावा !
आयोजकांच्या वतीने अधिवक्ता कार्ल तांबोळी आणि मुस्तफा काचवाला यांनी न्यायालयाला सांगितले की, फेस्टिवलसाठीच्या सर्व अनुमती घेतलेल्या आहेत. २५० हून अधिक सीसीटीव्ही छायाचित्रक लावलेले आहेत. ५०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी, तसेच गणवेशातील, तसेच विना गणवेशातील पोलीस, ७ रुग्णवाहिका आणि ७० वैद्यकीय कर्मचारी कार्यक्रमाच्या स्थळी तैनात आहेत.
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’