वसंतपंचमी उत्सव शुक्रवार, २३ जानेवारी या दिवशी साजरा होणार

भोजशाळा (मध्यप्रदेश) – पुढील वसंतपंचमी उत्सव शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ या दिवशी साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर वसंतपंचमीच्या दिवशी भोजशाळा परिसरात मुसलमान समाजाला प्रवेश रोखण्यात यावा आणि संपूर्ण दिवस हा परिसर हिंदूंना पूजनासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ‘जनउद्घोष सेवा संस्थान’चे संस्थापक कुलदीप तिवारी यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या संचालकांकडे केली आहे. वसंतपंचमी हा हिंदु समाजाचा प्रमुख उत्सव असून या दिवशी श्री वाग्देवीच्या (श्री सरस्वतीदेवीच्या) भक्तांकडून दिवसभर हवन, पूजन, आराधना इत्यादी धार्मिक उपक्रम केले जातात. मुसलमान समाज भोजशाळेवर दावा सांगत आहेत. त्यामुळे ज्या वेळी वसंतपंचमी शुक्रवारी येते, त्या वेळी या दिवशी मुसलमानांना नमाजपठण करू न देता पूर्ण दिवस हिंदूंना पूजाअर्चा करू द्यावी, अशी हिंदूंची मागणी आहे.
१. एप्रिल २०२४ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालातून भोजशाला हे हिंदूंचे धर्मस्थळ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
२. हिंदु समाज आपले आराध्य दैवत, धर्मस्थळ आणि श्रद्धा यांचे रक्षण करण्यासाठी पूर्णतः कटीबद्ध आहे. या उत्सवाच्या कालावधीत शासन, प्रशासन आणि समाज यांच्यासमोर कुठलीही बिकट परिस्थिती निर्माण होणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
भोजशाळा काय आहे ?
११ व्या शतकात परमार घराण्याने मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यावर राज्य केले. राजा भोज हे वर्ष १००० ते १०५५ पर्यंत धारचे शासक होते. विशेष म्हणजे राजा भोज श्री सरस्वतीदेवीचे परमभक्त होते. वर्ष १०३४ मध्ये राजा भोज यांनी एक महाविद्यालय स्थापन केले. हे महाविद्यालय नंतर ‘भोजशाळा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. यालाच श्री वाग्देवीचे (श्री सरस्वतीदेवीचे) मंदिरही म्हटले जात होते. त्यानंतर मुसलमानांनी त्यावर आक्रमण करून त्याचे मशिदीत रूपांतर केले.
संपादकीय भूमिकामुसलमानांच्या कह्यात असलेली हिंदूंची धार्मिक स्थळे त्यांना परत मिळण्यासाठी हिंदूंनी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार ? आता भाजप सरकारनेच यात हस्तक्षेप करून हिंदूंनी त्यांची धार्मिक स्थळे मिळवून द्यावीत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! |
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !