

१. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी नियोजित साधक सेवेला न आल्याने साधिकेला सेवेची संधी मिळणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९.५.२०२५ या कालावधीत फर्मागुडी (गोवा) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. ‘शंखनाद महोत्सवा’च्या पहिल्या दिवशी आम्ही (मी आणि एक साधिका) महोत्सवस्थळी पोचलो. तेव्हा आम्हाला एक साधक भेटले. ते आम्हाला म्हणाले, ‘‘एक नियोजित साधक ‘सद्गुरु पादुका दर्शन कक्षा’मध्ये सेवेला येऊ शकला नाही. तुम्ही दोघीजणी या कक्षात सेवेसाठी थांबू शकता का ? तुम्हाला दुसरी कोणती सेवा नाही ना ?’’ तेव्हा आम्हाला दुसरी कोणतीही सेवा नसल्याने आम्ही त्यांना त्वरित आनंदाने होकार दिला.
२. मी ही सेवा करत असतांना माझ्यात पुष्कळ कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव जागृत झाला.
३. ‘सद्गुरु पादुका दर्शन कक्षा’त सेवा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेली अनुभूती
माझे सलग ३ दिवस सेवेनिमित्त ‘सद्गुरु पादुका दर्शन कक्षा’त जाणे झाले. त्या कक्षात सेवा करतांना मला जाणवले, ‘परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मला त्यांच्या चरणांशी ठेवत आहेत आणि मी त्या दिशेने खेचली जात आहे.’
४. ही सेवा करण्यापूर्वी मला एका गोष्टीविषयी वाटणारी चिंता ही सेवा करतांना न्यून झाली.
५. या अनुभूतीमुळे माझ्या मनाला एक प्रकारचे समाधान, स्थिरता आणि शांती जाणवली.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला वरील अनुभूती आल्या आणि त्यांनीच त्या लिहून घेतल्या’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सुश्री सुगुणा गुज्जेटी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !