Statue Of Liberty : वादळी वार्‍यामुळे ब्राझिलमध्ये कोसळला स्वातंत्रदेवतेचा पुतळा !

ब्राझिलिया (ब्राझिल) – दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझिल देशाच्या रिओ ग्रांडे दो राज्यातील ग्वायबा शहरात वादळी वार्‍यामुळे ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ अर्थात् स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा काही सेकंदात कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. येथील हवन मेगास्टोअरच्या बाहेर २४ मीटर उंचीचा हा पुतळा होता. ही घटना घडली, तेव्हा येथील वार्‍याचा वेग ताशी ९० कि.मी.हून अधिक होता. वर्ष २०२० मध्ये या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती.

याआधी वर्ष २०२१ मध्येही असाच एक पुतळा ब्राझिलमध्ये कोसळला होता. तेव्हाही अशाच प्रकारे ताशी ८० ते ९० कि.मी. वेगाने वारे वहात होते.