दादर (मुंबई) येथील आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग

मुंबई – शिवडी येथे १९ ते २१ डिसेंबरला होणार्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ या वादग्रस्त पाश्चात्त्य संगीताच्या कार्यक्रमाचा इतिहास अमली पदार्थांचे अतीसेवन, युवकांचे मृत्यू, अश्लीलता असा आहे. याच्या आयोजकांनी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडवला आहे. हा कार्यक्रम रहित करण्यासाठी ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या वतीने दादर (पूर्व) येथील रेल्वेस्थानकाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यामध्ये युवक आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी ‘सनबर्न’ला तीव्र विरोध दर्शवला.
नशेच्या विळख्यात ढकलण्यारा ‘सनबर्न’ रहित करा ! – कु. श्रेया नलावडे, महाविद्यालयीन विद्यार्थीआम्ही विद्यार्थी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध करण्यासाठी या आंदोलनात सहभागी झालो आहोत; कारण मनोरंजनाच्या नावाखाली हा कार्यक्रम सरळसरळ नशेला प्रोत्साहन देत आहे. वर्ष २०१३, २०१९ आणि २०२४ मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या आयोजकांवर अनेक गुन्हे नोंद झाले आहेत. नशा आणि अमली पदार्थांच्या सेवनाला प्रोत्साहन देणार्या या ‘फेस्टिव्हल’ला सरकार अनुमती का देत आहे ? याद्वारे तरुणांना नशेच्या विळख्यात ढकलायचे आहे का ? कि अमली पदार्थामुळे पुन्हा मृत्यू होऊ द्यायचे आहेत ? माझा सरकारला प्रश्न आहे की, अमली पदार्थांना प्रोत्साहन देणार्या या कार्यक्रमाच्या मागे काय उद्देश आहे ? म्हणून आम्हा विद्यार्थ्यांची मागणी आहे की, हा कार्यक्रम त्वरित रहित करण्यात यावा. |
अमली पदार्थांशी संबंधित या फेस्टिव्हलच्या विरोधात सरकार ‘शून्य सहनशीलते’ची भूमिका का घेत नाही ? – धनश्री केळशीकर, सदस्या, नशा विरोधी संघर्ष अभियान
गोवा सरकारने स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे अमली पदार्थामुळे झालेले मृत्यू आणि अनैतिक कृत्यांच्या इतिहासामुळे या सनबर्नच्या आयोजकांना तिथून हाकलून लावले आहे. असे असतांना सरकार अमली पदार्थांसाठी ओळखल्या जाणार्या या कार्यक्रमाच्या संदर्भात शून्य सहनशीलतेची भूमिका का घेत नाही ? अमली पदार्थांच्या वापरासाठी कुप्रसिद्ध असलेला हा कार्यक्रम मुंबईत होऊ देणे, हा शुद्ध ढोंगीपणा आहे. त्यामुळे सनबर्न फेस्टिव्हल कायमचा बंद झाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे.
क्षणचित्रे
१. नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या या आंदोलनात ‘सनबर्न हटवा देश वाचवा’, ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
२. आंदोलकांनी ‘सनबर्न’ला विरोध करणारे फलक हातात धरले होते.
अनेक मान्यवर आणि संघटना यांचा सहभाग
मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता राहुल पाटकर; शिवसेनेच्या महिला पदाधिकारी; मानव सेवा प्रतिष्ठान, वज्रदल संघटना, विश्व हिंदु परिषद, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटनाचे पदाधिकारी; महाविद्यालयीन युवक आणि युवती; राष्ट्रप्रेमी नागरिक
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !
आंबिवली (कल्याण) येथील इराणी लोकांकडून बसवर दगडफेक; प्रवासी घायाळ
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !