‘मागील काही मासांपासून सनातनचे ११४ वे संत पू. लक्ष्मण गोरे (वय ८४ वर्षे) यांची प्रकृती वयोमानामुळे बरी नाही. पूर्वी त्यांना अन्य व्यक्तीचा मृत्यू झाला आहे’, असे कळल्यावर भीती वाटून त्रास होत असे; परंतु आता ते स्वतःच्या मृत्यूविषयी शांतपणे बोलत आहेत. आता मृत्यू आनंदाने स्वीकारण्याची त्यांची सिद्धता झाली आहे. आम्हाला जाणवलेली ‘पू. आजोबांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे’ येथे दिली आहेत.

१. पृथ्वीवरील जीवन संपवून पुढील लोकात जाण्यास सिद्ध होणे
८.१०.२०२५ या दिवशी पू. बाबा मला म्हणाले, ‘‘माझे इथले पोथीवाचन झाले आहे. आता मला पुढील प्रवासाला जायचे आहे.’’ तेव्हा आईने (सौ. मंगला गोरे यांनी) त्यांना विचारले, ‘‘कुठे जायचे आहे ?’’ त्यावर पू. बाबा म्हणाले, ‘‘आश्रमात !’’
२. सहजावस्थेत असलेल्या पू. गोरेआजोबा यांनी सर्व कर्तेपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करणे
३१.१०.२०२५ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात सतत असणारे पू. गोरेआजोबा !’ हा मथळा असलेला एक लेख प्रकाशित झाला होता. तो लेख पाहून पू. बाबा म्हणाले, ‘‘माझ्याविषयी एवढे लिहून आले आहे. मला याची जाणीवच नाही. गुरुदेवांमुळे मला हे समजले. हे सगळे गुरुदेवांमुळे झाले आहे. गुरुदेवांनी सर्व काही करून घेतले आणि तेच करून घेतात. मी केवळ नामाचा आनंद घेतो.’’
त्या लेखात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एक टीप लिहिली होती, ‘लेख लिहून देणार्या श्री. वैभव आफळे (पू. गोरे यांचे जावई, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५५ वर्षे) आणि सौ. गौरी आफळे यांनाही खाऊ द्या.’ ही टीप वाचून पू. बाबा म्हणाले, ‘‘गुरुदेव किती कौतुक करतात ना ! आपणही हे शिकायला हवे.’’
३. पू. आजोबांनी ‘माझा मृत्यू अगदी जवळ आला आहे’, असे म्हटल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे ‘पू. आजोबा साधनेत पुढे जात आहेत’, हे बोल आठवून ताण न येणे
१७.११.२०२५ या दिवशी पू. बाबांना आसंदीवर बसवल्यावर ते म्हणाले, ‘‘माझा मृत्यू अगदी जवळ आला आहे. चल ‘बॅग’ भर. तुझ्या घरी चल.’’ आदल्याच दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे श्री. वैभव आफळे यांच्याशी बोलणे झाले होते. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, ‘‘पू. आजोबा आता पुढे पुढे जात आहेत. त्यांची काळजी करायला नको.’’ यावरून ‘गुरुदेवांचे कसे लक्ष असते ? ते आपली किती काळजी घेतात ?’, हे आम्ही अनुभवले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या प्रीतीमय दिव्य वाणीमुळे आम्हाला पू. बाबांच्या वरील स्थितीचा ताण आला नाही. ‘जे काही होणार, ते भगवंताच्या कृपेने होणार आहे’, याविषयी गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी कृतज्ञता दाटून आली.

४. पू. बाबांशी झालेले संभाषण
१९.११.२०२५ या दिवशी पू. बाबांशी माझे पुढील संभाषण झाले.
४ अ. पू. बाबांनी ‘माझा मृत्यू अगदी जवळ आला असून मृत्यूनंतर मी आणखी आनंदी होणार आहे’, असे सांगणे
पू. बाबा : माझा मृत्यू अगदी जवळ आलेला दिसत आहे.
सौ. गौरी : म्हणजे काय दिसत आहे ?
पू. बाबा : सुंदर निसर्ग दिसत आहे. माझे जीवन आता सुखावह होणार आहे, म्हणजे ‘आता मी दुःखात आहे’, असे नाही; पण मृत्यूनंतर मी आणखी आनंदी होणार आहे.
४ आ. पू. बाबांनी ‘ईश्वर मला न्यायला आला असून ‘मृत्यूनंतर मी सेवा कशी करणार ?’, हा विचार मनात येत आहे’, असे सांगणे
पू. बाबा : मला न्यायला आला आहे.
सौ. गौरी : कोण आले आहे ?
पू. बाबा : ईश्वर ! तो दिसत नाही; पण तो आला आहे. माझ्या मनात एकच विचार येत आहे.
सौ. गौरी : कोणता विचार येत आहे ?
पू. बाबा : ‘देवा तुझेच मी लेकरू । तुझी कशी सेवा करू ।।’ (प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनातील ध्रुवपद) मी मृत्यूची वाट पहात आहे आणि मला आनंद होत आहे. मी वर वर आकाशात जात आहे. मी आनंदाने वर जात आहे. ‘मृत्यूनंतर मी सेवा कशी करणार ?’, याचाच विचार मनात येत आहे.
(तितक्यात घराबाहेर एक गाय हंबरली.)
५. पू. बाबा मृत्यूची आनंदाने वाट पहात असलेले पाहून ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ हे अनुभवायला मिळणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटणे
मागील साधारण २० वर्षांपासून पू. बाबांना कुणाचा मृत्यू झाल्याचे समजले की, त्यांचे विचार वाढत असत. त्यांना भय वाटून त्यांच्या छातीतही दुखत असे. हे लक्षात आल्यावर आम्ही कुटुंबीय त्यांच्यासमोर कुणाच्या मृत्यूविषयी बोलणे टाळायचो; परंतु पू. बाबांना आता स्वतःच्या मृत्यूचेही भय वाटत नाही आणि ते मृत्यू आनंदाने स्वीकारत आहेत. यालाच ‘गुरुकृपा’ असे म्हणतात.
‘प.पू. डॉक्टर, आज पुन्हा एकदा मी ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे ‘गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते.’ हे अनुभवले, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. गौरी वैभव आफळे (पू. गोरेआजोबांची मुलगी), फोंडा, गोवा. (६.१२.२०२५)
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !