
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – १५ मार्च २०२४ या दिवशी संच मान्यतेच्या आदेशावर अनेक शिक्षक संघटना न्यायालयामध्ये गेल्या. त्यावर २ सुनावण्याही झालेल्या आहेत. उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर २०२५ या दिवशी दिलेल्या निर्णयान्वये सदर याचिका निकाली काढून १५ मार्च २०२४ मधील तरतुदी वैध असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गात शिक्षक दिला जाईल, हे शासनाचे दायित्व आहे, असे उत्तर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिले.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, ‘‘आधीच्या काळात दुर्गम, डोंगराळ भाग होता. आता विकासकामांतून दुर्गम, डोंगराळ भाग राहिलेला नाही. ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्या त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे दायित्व सरकारचे आहे.’’
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !