
नागपूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करणारे, तसेच वर्ग २ च्या भूमी वर्ग १ करण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत निवेदन केले. मुंबई येथील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारती मोडकळीस आल्या असून त्यांना स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन देणारा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकापैकी २५ टक्के चटईक्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या अटीमुळे सोसायट्यांना योजनेचा लाभ घेता येत नव्हता. आता स्वयंपुनर्विकास करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही २५ टक्के ‘एफ्.एस्.आय.’ची अट वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !