काँग्रेसचे खासदार गोवाल कागडा पडवी यांची लोकसभेत हिंदुद्वेषी मागणी !

नवी देहली – महाराष्ट्रातील नंदुरबार येथील काँग्रेसचे खासदार गोवाल कागडा पडवी यांनी लोकसभेत भाषण करतांना आदिवासी समाजाला हिंदु धर्मापासून वेगळे करून त्यांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची मागणी केली. त्यांचा दावा होता की, वर्ष १९३१ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत आदिवासींना स्वतंत्र गटात मोजण्यात आले होते आणि त्यांची संस्कृती कोणत्याही स्थिर धर्मात बसत नाही. (ब्रिटिशांनी भारतात सत्ता उपभोगण्यासाठी ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने याच नीतीचा अवलंब करत हिंदूंना संघटित होऊ दिले नाही, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक)
⚠️ Congress MP Padavi’s Shocking Anti-Hindu Demand
Congress MP Gowaal Kagada Padavi (Nandurbar) urged in Lok Sabha that tribals be separated from Hindu Dharma and given a new religion status
British “Divide & Rule” politics is now being repeated by Congress to break Hindu unity… pic.twitter.com/ME7Fsn2PGN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 12, 2025
१. पडवी यांच्या मतानुसार ‘स्वतंत्र धर्म’ म्हणून आदिवासींना ओळख मिळाल्यास समाजाची सांस्कृतिक ओळख सुरक्षित राहील आणि त्यांच्या परंपरांचे संरक्षण होईल.
२. हे विधान समोर आल्यानंतर सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी दाखले देत सांगितले की, आदिवासी परंपरा शतकानुशतके हिंदु धर्माशी जोडलेल्या आहेत आणि निसर्गपूजा ही हिंदु परंपरेचा मूलाधार आहे.
३. या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी सांगितले की, काँग्रेसचे हे विधान समाजात फूट पाडणारे असून राष्ट्राच्या एकात्मतेविरुद्ध आहे.
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !