‘आपल्या आश्रमाला (रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला) भेट दिल्यानंतर माझ्या मनाला पुष्कळ समाधान वाटले. आपल्या आश्रमातील शिस्तबद्धता, स्वच्छता, शांतता, महाप्रसाद व्यवस्था, व्यवस्थापन, ध्वनीचित्रीकरण कक्ष आणि स्वागतकक्ष हे पाहून अन् परम पूज्य आणि सद्गुरु यांच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले.
तुकोबाराय यांच्या या अभंगाप्रमाणे
आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ।। १ ।।
भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद ।। २ ।।
– संत तुकाराम महाराज
अर्थ : हे भगवंता, मी तुझ्या चरणांचे दर्शन घेतले. आता माझे मन कुठल्या ठिकाणी धाव घेईल ? माझ्या मनाला आता अन्य काहीच सुचत नाही. यामुळे माझा सर्व शीण निघून गेला आहे आणि मी आनंदाचाच अनुभव घेत आहे.
अशी माझी स्थिती झाली आहे.
वारकरी संप्रदायाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा !’
– ह.भ.प. चंद्रकांत नारायण जमदाडे, सातारा. (१२.३.२०२५)


सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !