सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आणि शस्त्रास्त्र प्रदर्शनातून होणार गौरवशाली इतिहासाचे दर्शन !

देहली – सनातन संस्था आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ येत्या १३, १४ आणि १५ डिसेंबर या दिवशी भारत मंडपम्, प्रगती मैदान, नवी देहली येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आपली सनातन परंपरा आणि संस्कृती समाजात पुन्हा एकदा सुदृढ आणि मजबूत करण्याचे, तसेच आपल्या परंपरांचे बीज नव्या पिढ्यांमध्ये रोवण्याचे कार्य केले जाईल. हा ‘शंखनाद महोत्सव’ यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे, असे मत पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचे धोरणतज्ञ, तसेच ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’चे सदस्य आणि नागपूरच्या आय.आय.एम्.च्या बांधकाम समितीचे अध्यक्ष श्री. वैभव डांगे यांनी व्यक्त केले. श्री. डांगे यांनी सनातन संस्था आणि त्यांच्या संपूर्ण समूहाचे राष्ट्र आणि धर्मजागृतीपर आयोजनासाठी मनःपूर्वक अभिनंदन केले, तसेच ‘सर्वांनी या महोत्सवात अवश्य सहभागी व्हावे’, असे आवाहनही केले.
देहलीतील ‘सरयु ट्रस्ट’चे संस्थापक श्री. राहुल दिवाण यांनी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन एका व्हिडिओद्वारे केले आहे.

| छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या शस्त्रांचे भव्य प्रदर्शन हे महोत्सवाचे विशेष आकर्षण !
श्री. डांगे पुढे म्हणाले, ‘‘महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे १५ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेले १४ व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य राजांनी वापरलेल्या शस्त्रांचे भव्य प्रदर्शन ! प्रदर्शनामुळे आजच्या पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाला जाणून घेण्याची आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कठीण परिस्थितीत संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली, याचे उत्कृष्ट अनुभवही आपल्याला पहावयास मिळतील. त्यांनी किती खडतर परिस्थितीत स्वराज्य मिळवले आहे, तसेच अलौकिक वारशाचे केवळ जतन न करता त्याचे तेज अधिक प्रखर करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत म्हणून पुढे नेण्याच्या दृष्टीने सध्याच्या आणि येणार्या पिढीचे नेमके काय कर्तव्य आहे, या गहन विचारांचे मंथन करण्याची संधीही या निमित्ताने मिळणार आहे.’’ |
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !