
कोल्हापूर, ११ डिसेंबर (वार्ता.) – मंदिर हस्तांतरणात पूर्ण मुद्रांक शुल्क आकारले जाते. तरी मंदिरांचे मुद्रांक शुल्क यांसह कोणत्याही प्रकारचे शुल्क आणि कर पूर्णपणे रहित करावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले.
या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अशोक गुरव, श्री. आप्पासाहेब गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, हिंदु एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, श्री. दिलीप भिवटे, हिंदु महासभेचे श्री. प्रशांत पाटील, हिंदु जागरणचे धर्मप्रचारक श्री. सनी पेनकर, श्री. विकास जाधव, रश्मी साळोखे, पूजा शिंदे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग, भाजपच्या सौ. वंदना बंबलवाड, मराठा तितुका मेळवावेचे श्री. योगेश केरकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे, श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य उपस्थित होते.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !