‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पाहून प्रभावित झालेले पुणे येथील वाचक आणि हितचिंतक यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. त्यानिमित्त ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वाचक आणि हितचिंतक यांनी व्यक्त केलेले मनोगत पुढे दिले आहे.

१. श्री. पारस कांकरिया, तानाजीनगर, चिंचवड, पुणे.

अ. ‘मला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला येण्याचे निमंत्रण मिळाले. मला साधकांच्या समवेत महोत्सव अनुभवण्याची इच्छा होती. प्रत्यक्षातही मला साधकांच्या समवेत महोत्सवाच्या ठिकाणी पुष्कळ आनंद मिळाला. असे आयोजन आणि अप्रतिम नियोजन मी आतापर्यंत कुठेच पाहिले नाही.

आ. माझी कुंभमेळ्याला जाण्याची इच्छा होती. मी या महोत्सवाला आल्यामुळे माझी ती इच्छा पूर्ण झाली.

इ. महोत्सवामधील ‘साधकांचा प्रेमभाव, सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन आणि वातावरणातील चैतन्य’ यांमुळे मला पुष्कळ आनंद मिळाला.

ई. महोत्सवाहून घरी आल्यावर मी साधकांना भेटून त्यांच्याकडून साधना समजून घेतली. आता मी गुरुदेव दत्ताचा नामजप करत आहे. मी ‘देवघरातील देवतांची मांडणी शास्त्रानुसार कशी करायची ?’, याविषयी समजून घतले आणि त्यानुसार पालट केला आहे.’

२. श्री. नंदकुमार धायगुडे, पुणे

२ अ. विविध संत-महंत, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि विचारवंत यांची लाभलेली अमूल्य उपस्थिती ! : ‘महोत्सवात विविध संत-महंत, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि विचारवंत यांची अमूल्य उपस्थिती लाभली. प.पू. स्वामी गोविंददेव महाराज, तसेच प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूरजी यांच्या उपस्थितीने वातावरण आध्यात्मिकतेने भारून गेले. सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय आणि मेजर गौरव आर्य यांचे राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाच्या संदर्भातील विचार ऐकून तरुण पिढीला नवा दृष्टीकोन मिळाला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अनेक मान्यवर मंत्री यांनीही या सोहळ्यात उपस्थिती लावून श्रद्धा व्यक्त केली.

२ आ. आम्ही महोत्सवातील ३ दिवस समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा घेऊन घरी आलो.

२ इ. हा संपूर्ण महोत्सव म्हणजे ‘भावी सनातन राष्ट्राचा उद्घोष, धर्मशक्तीची जागृती आणि राष्ट्राभिमानाचे पुनरुज्जीवन’ यांचा साक्षात्कार होता. ‘याचे साक्षीदार होणे’, हे आमच्यासाठी अतुलनीय आध्यात्मिक सौभाग्य ठरले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १८.६.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक