आता प्रतीक्षा अवघ्या एका दिवसाची !
नवी देहली (इंद्रप्रस्थ) : येथील भारत मंडपम् मध्ये १३ आणि १४ डिसेंबर या दिवसांमध्ये होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची सिद्धता अंतिम टप्प्यात आली आहे. राष्ट्र-धर्म प्रेमी यांच्या पुढाकारामुळे महोत्सवासाठी करण्यात येणारी नोंदणी उच्चांक गाठत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि उत्तर भारतातील राज्ये अशा विविध ठिकाणांहून महोत्सवाविषयी अनेकांचे अभिप्राय येत असून महोत्सवाविषयी त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. सामाजिक माध्यमे आणि विविध यू ट्यूब वाहिन्या यांच्याद्वारे राष्ट्र-धर्मप्रेमी महोत्सवाचा प्रसार करत आहेत. काही ‘इन्फ्लुएन्सर’ (सामाजिक माध्यमांद्वारे स्वतःचा प्रभाव निर्माण करणारे) स्वतःहून महोत्सवाच्या जागृतीविषयीचे व्हिडिओ बनवून प्रसारित करत आहेत. महोत्सवामुळे देहलीतील वातावरण भगवेमय झालेले आहे.
Excitement Peaks in Delhi Ahead of Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav!
With just 1 day to go, registrations are soaring as devotees from across India prepare to witness the grand festival at Bharat Mandapam on 13–14 Dec.
Cultural displays, Shivaji-era valor, and the 'Shankhnad'… pic.twitter.com/UBmfT1qi9s— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 11, 2025
अनेकांकडून ‘देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातून होणारा शंखनाद आंतरराष्ट्रीय स्तरावर हुंकार भरेल, यासाठी आम्ही सिद्धता करत आहोत’, असे अभिप्राय येत आहेत. गोव्यातील महोत्सव हा बीजरूपाने होता. ‘आता देहली येथील शंखनाद महोत्सव सनातन राष्ट्ररूपी वृक्ष होण्याकडे वाटचाल करणार आहे’, असे हिंदुत्वनिष्ठांचे म्हणणे आहे. या महोत्सवात अनेक प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी, महनीय व्यक्ती, माजी सैन्याधिकारी हे संस्कृती, शौर्य, संरक्षण या अनुषंगाने काय मार्गदर्शन करणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकजण ‘आम्हाला ऑनलाईन कार्यक्रम बघता येईल का ?’, ‘आम्हाला महोत्सवाची ‘लिंक’ मिळेल का ?’ अशी विचारणा करत आहेत.
या महोत्सवाचा सर्वत्रच्या हिंदूंना लाभ घेता यावा, यासाठी पुढील ‘लिंक’ उपलब्ध करून देण्यात आली आहे.www.sanatanrashtrashankhnad.inOR |


Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !
देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे आक्रमणाची शक्यता : सरकारकडून अतीदक्षतेची चेतावणी
हिंदु धर्माचीही नोंदणी झालेली नाही ! – RSS Chief Mohan Bhagwat
Telegram Blocked : ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्रामवर बंदी
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम