अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची ‘तुघलकी’ घोषणा !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका भारतातून येणारा तांदुळ आणि कॅनडातून येणारे खत यांवर अतिरिक्त शुल्क (टॅरिफ) लावण्याचा विचार करत आहे, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ते व्हाईट हाऊसमध्ये बोलत होते. ट्रम्प यांनी यापूर्वीच भारतावर एकूण ५० टक्के शुल्क लावले आहे.
🔥 Trump’s ‘Tughlaki’ Move on Indian Rice?
Since American farmers are suffering losses, Trump now threatens additional tariffs on Indian rice
Cheap imports from India, Vietnam & Thailand are being blamed, while he even considers extra duty on Canadian fertilizers.
Trump… pic.twitter.com/cgl2h2miYF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 9, 2025
१. ट्रम्प म्हणाले की, इतर देशांतून येणारा स्वस्त माल अमेरिकी शेतकर्यांची हानी करत आहे. भारत, व्हिएतनाम आणि थायलंड यांसारखे देश अमेरिकेत अतिशय स्वस्त तांदूळ विकत आहेत, ज्यामुळे येथील शेतकर्यांचे उत्पन्न अल्प होत आहे.
२. ट्रम्प यांनी या वेळी त्यांच्या अर्थमंत्र्यांना विचारले की, भारताला तांदुळाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची सूट मिळाली आहे का ? यावर मंत्र्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील व्यापार करारावर सध्या चर्चा चालू आहे.
तांदुळावर शुल्क लावल्यास काय परिणाम होणार ?
जर ट्रम्प यांनी भारतीय तांदुळावर अतिरिक्त शुल्क लावले, तर भारतातून अमेरिकेला जाणारा तांदूळ पुष्कळ महाग होईल. यामुळे तेथे भारतीय तांदूळ खरेदी करणार्या लोकांच्या खिशावर थेट परिणाम होईल; कारण किमती वाढतील. तसेच भारतातील जे शेतकरी आणि निर्यातदार अमेरिकेत तांदूळ निर्यात करतात, त्यांनाही हानी सहन करावी लागू शकते. महाग झाल्यामुळे अमेरिकी बाजारात भारतीय तांदुळाची मागणी अल्प होऊ शकते.
भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात करत नाही. त्यामुळे हा निर्णय भारताच्या संपूर्ण तांदूळ उद्योगावर परिणाम करणार नाही; परंतु ज्या लोकांचा व्यवसाय थेट अमेरिकेशी संबंधित आहे, त्यांना नक्कीच त्रास होईल. भारताला पुन्हा ज्या देशांमध्ये तांदूळ विकला जाऊ शकेल, अश नवीन देशांचा शोध घ्यावा लागेल.
संपादकीय भूमिकाभारतामुळे नाही, तर स्वतः ट्रम्प यांच्यामुळेच अमेरिकेची सर्वाधिक हानी होत आहे, हे संपूर्ण जग पहात आहे. ट्रम्प आणखी ३ वर्षे सत्तेत असणार आहेत. या काळात अमेरिकेची वाताहात झाल्याविना रहाणार नाही, असेच चित्र आहे. याचा विचार अमेरिकी शेतकरी आणि जनता यांनी करायला हवा ! |

कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !
US-Iran Ceasefire : इराणने व्यापारी नौकेवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेकडून इराणच्या सैन्यातळांवर आक्रमण