Baidyanath Dham Prasad : देवघर (झारखंड) येथील बैधनाथ धामच्या ठिकाणी विकण्यात येणार्‍या प्रसादामध्ये भेसळ

देवघर (झारखंड) – श्रावणी मेळ्यामुळे जगप्रसिद्ध असलेल्या बैधनाथ धाममध्ये वर्षभर मिळणारा चूरा आणि पेढा प्रसाद म्हणून ओळखला जातो; परंतु अन्न सुरक्षा विभागाने घेतलेल्या नमुन्यांत या पेढ्यात मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याचे समोर आले. विभागाने ७२ दुकानांतून पेढ्याचे नमुने घेतले. रांचीतील प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर आढळले की, काही नमुन्यांत माती मिसळलेली होती. अन्न सुरक्षा अधिकारी एस्.के. सिंह यांच्या म्हणण्यानुसार या अहवालाच्या आधारे भेसळ करणार्‍यांना नोटीस देऊन नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे.

बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांतील मोठे व्यापारी मशीनद्वारे अल्प खर्चाचा मावा बनवतात आणि नंतर त्याचा वापर पेढे बनवतांना होतो.

संपादकीय भूमिका

प्रसादामध्ये भेसळ करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !