
नवी देहली : रिझर्व्ह बँकेच्या आकडेवाडीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ६ लाख १५ सहस्र ६४७ कोटी रुपयांची एकत्रित कर्ज रक्कम गेल्या साडेपाच वर्षांत माफ केली, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. या बँकांनी १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत भाग आणि कर्जरोखे यांद्वारे बाजारातून १ लाख ७९ सहस्र कोटी रुपये भांडवल उभारल्याचेही मंत्री चौधरी यांनी सांगितले. २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कोणतीही भांडवली गुंतवणूक केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
सप्टेंबर २०२५ पर्यंत गेल्या साडेचार वर्षांत ३ सहस्र ५८८ कोटी २२ लाख रुपयांच्या फसवणुकीचे ५ लाख ८३ सहस्र २९१ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी २३८ कोटी ८३ लाख रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती मंत्री चौधरी यांनी दिली.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !