‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’ला विरार-वसईकरांचा पाठिंबा !

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे निबंधक  प्रणय घरत यांना ‘सनबर्न फेस्टिव्हल’ विरोधातील हस्तपत्रक देतांना

पालघर – जिल्ह्यातील वसई, विरार या ठिकाणी हे अभियान चालू झाले आहे. याला समाजातून पाठिंबा मिळत आहे. या अंतर्गत अण्णासाहेब वर्तक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, योगेश्वरी क्लासेस (वसई पश्चिम), तुंगारेश्वर येथील श्री शनिधाम मंदिर, उमेळे (नायगाव) येथील दत्त मंदिर, वास्तूविशारद शैलेश मिस्त्री यांचे कार्यालय येथे जाऊन या कार्यक्रमाचे समाज आणि राष्ट्र यांना असलेले धोके याविषयी जागृती केली, तसेच या संदर्भातील पत्रके वितरीत करून समाजात जागृती केली जात आहे.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक आणि वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. स्नेहा दुबे यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

वसई येथील महाविद्यालयात या फेस्टिव्हलच्या विरोधात जनजागृती केल्यावर विद्यार्थिनींनी पुढील प्रतिक्रिया दिल्या.

वंदना प्रजापती, विद्यार्थिनी, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, वसई : अशा फेस्टिव्हलमुळे देशातील युवा पिढी चुकीच्या मार्गावर जात आहे. अशा प्रकारच्या वातावरणामुळे अमली पदार्थांचा व्यापार, कर्कश आवाजाच्या भोंग्यांचा त्रास आणि बलात्कार यांसारखे गुन्हे वाढत जातील आणि सरकारलाही ते थांबवता येणार नाहीत. त्यामुळे जर आपल्याला महिलांची सुरक्षा करायची असेल आणि भारताला पुढे न्यायचे असेल, तर हा सनबर्न फेस्टिव्हल त्वरित थांबवला पाहिजे.

वेदिका पाटील, विद्यार्थिनी : ‘सनबर्न फेस्टिव्हल’ बंद व्हायला हवा; कारण तिथे ‘रेप ड्रग्ज’सारखे अमली पदार्थही विकतात. यामुळे तिथे पुष्कळ घाणेरड्या आणि वाईट गोष्टी घडतात, ज्या व्हायला नकोत. भारताचे नागरिक म्हणून आपले हे उत्तरदायित्व आहे की, अशा गोष्टी होऊ नयेत.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांना ‘सनबर्न फेस्टिव्हल’ विरोधात निवेदन देतांना