
मुंबई – गोरेगाव येथील विवेक महाविद्यालयात सुरक्षेच्या कारणावरून महाविद्यालय प्रशासनाने ‘परिसरात आणि वर्गामध्ये मुसलमान विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास अनुमती नाही’, असे सांगितले. त्याला मुसलमान विद्यार्थिनींनी विरोध करून महाविद्यालयाच्या बाहेर उपोषण चालू केले. ‘महाविद्यालयाचा हा निर्णय आमचे धार्मिक स्वातंत्र्य आणि महिलांच्या हक्कांचे उल्लंघन करणारा आहे’, असा विद्यार्थिनींनी म्हटले आहे. (बुरखा घालाव्या लागणार्या विद्यार्थिनींनी महिलांच्या हक्कांविषयी बोलावे, यापेक्षा दुसरे हास्यास्पद जगात काय असू शकते ? – संपादक)
विद्यार्थिनी म्हणाल्या की, महाविद्यालयात प्रवेश घेतांना आम्हाला ‘ड्रेस कोड’विषयी (वस्त्रसंहितेविषयी) कल्पना देण्यात आली नव्हती. आधी माहिती असती, तर आम्ही प्रवेश घेतलाच नसता. बुरखा घालणे, ही धार्मिक श्रद्धेची आणि वैयक्तिक आवडीची गोष्ट आहे. महाविद्यालयातही बुरखा घालण्याची अनुमती मिळाली पाहिजे.
ए.आय.एम्.आय.एम्. पक्षाच्या मुंबई महिला शाखेच्या उपाध्यक्षा जहांआरा शेख म्हणाल्या की, ज्या विद्यार्थिनींना चेहरा झाकल्याखेरीज अस्वस्थ वाटते, त्यांना बुरखा घालण्याची अनुमती दिली पाहिजे. हा पोशाख अभ्यासात किंवा महाविद्यालयीन शिस्तीत अडथळा येत नाही, तोपर्यंत घालण्याचा अधिकार असला पाहिजे.
महाविद्यालय प्रशासनाने म्हटले की, बुरखा चेहरा झाकतो, ज्यामुळे महिला विद्यार्थिनींची ओळख पटवणे कठीण होते. हा निर्णय धार्मिक भावनांच्या विरोधात नसून परिसराच्या सुरक्षेसाठी आहे.
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !