६ डिसेंबरला होणार आहे मशिदीची पायाभरणी

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार हुमायू कबीर यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांग येथे ६ डिसेंबर या दिवशी बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याची चिथावणीखोर घोषणा केली आहे. याविरोधात उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास कोलकाता उच्च न्यायालयाने राज्यात शांतता राखण्याचे काम राज्य सरकारचे असल्याचे सांगत यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
सरकारकडून न्यायालयास सांगण्यात आले की, राज्य प्रशासनाने परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. केंद्र सरकारनेही कळवले की, त्या भागात आधीपासून केंद्रीय सुरक्षा दलांच्या १९ तुकड्या तैनात आहेत.
हुमायू कबीर करणार राजकीय पक्षाची स्थापना !
हुमायू कबीर यांना शिस्तभंगाच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसने निलंबित केल्यानंतर कबीर यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न