वाशी – विश्व हिंदु परिषद अंतर्गत बजरंग दल नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने गीता जयंतीच्या निमित्ताने येथे गीता जयंती उत्सव साजरा करण्यात आला. भगवद्गीता श्लोकांचे पठण, तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईतील प्रखंडांमध्ये भगवद्गीता जयंती उत्सव पार पडला.
उत्सवात बजरंग दल कोकण प्रांत महाविद्यालयीन प्रमुख सर्वेश तिवारी प्रमुख वक्ते होते. त्यांनी गीता जयंती आणि शौर्य दिवस यासंदर्भात संबोधन केले.
१४ डिसेंबर या दिवशी नवी मुंबईत बजरंग दल नवी मुंबई जिल्हा आणि कळवा मुंब्रा जिल्ह्यात भव्य शौर्य संचलन होणार आहे. याची माहिती नवी मुंबई जिल्हा संयोजक शंकर संगपाळ यांनी देऊन त्यात सहभागी होण्याचे तरुणांना आवाहन केले.

देवनाथ म्हात्रे यांनी नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाविषयी यशस्वी पाठपुरावा केल्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास बजरंग दल ठाणे विभाग संयोजक अमरजीत सुर्वे, विश्व हिंदु परिषद नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक भन्साळी, जिल्हामंत्री स्वरूप पाटील, जिल्हा सहमंत्री शाम मोहनन, विशेष संपर्कप्रमुख मुकेश गांधी, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अरुण पाटील, तेजस पाटील, जिल्हा सुरक्षा प्रमुख संजीव रावत आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !