यवतमाळ, जिल्हा पुसद येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ लेखक, साहित्यिक दिवंगत शंकर पांडे यांचा प्रथम स्मृतीदिन आज मार्गशीर्ष शुक्ल नवमी (२९.११.२०२५ या दिवशी) आहे. त्यानिमित्त…

कै. शंकर गो. पांडे यांचे प्रखर आणि सडेतोड हिंदुत्वाचे लेखन दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध होत होते. ते एक प्रथितयश लेखक आणि साहित्यिक म्हणून विदर्भात सर्वपरिचित झाले होते. सनातन धर्म, हिंदुत्व, प्राचीनतम भारतीय वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती यांसारख्या विषयांवर अतिशय सखोल, अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील समाजसुधारणेच्या आंतरिक तळमळीने त्यांनी विदर्भातील अनेक वृत्तपत्रांतून विभिन्न प्रकारच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, राष्ट्रीय विषयांवर स्फुट अन् वैचारिक लेखांद्वारे जनजागृती केली. बालबोध आणि लघुकथा यांतूनही त्यांनी राष्ट्रवादी विचाराला पोषक जनजागृती करण्याचा अखंडपणे प्रयत्न केला.
महाराष्ट्र विद्युत् महामंडाळात आयुष्यभर लेखापाल पदावरील सेवा करत यशस्वीपणे प्रपंच सांभाळला आणि मुलांनाही उच्चशिक्षित केले. एक आदर्श शेतकरी म्हणूनही जीवन जगतांना अभ्यासपूर्ण विविध विषयांवरील विधायक लेखन करण्याचा, साहित्यनिर्मितीचा छंद त्यांनी आयुष्यभर पोसला. नुकतेच काही दिवसांपूर्वी सपत्नीक मी त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेटीसाठी पुसद येथे गेलो, तेव्हा त्यांनी आदर्शसाहित्य निर्मितीपायी केलेल्या प्रचंड संदर्भ ग्रंथांचा आणि विपुल वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह पाहून थक्क झालो. त्यांनी स्वगृही एक ग्रंथालयच निर्माण केलेले दिसले. त्यांच्या निधनाच्या थोड्या दिवसांपूर्वीच त्यांचा ‘जागल्या’ हा लेखसंग्रह प्रसिद्ध झाला होता. हे पुस्तक भारतातील सर्व मराठी भाषिकांनी आणि विशेषतः हिंदूंनी अवश्य वाचावे, असे आणि भावी पिढ्यांची राष्ट्रीय अन् हिंदु धर्म स्वाभिमानी अशी मानसिक जडणघडण होण्यासाठी उपयुक्त असेच आहे.
या लेख संग्रहातील एक लेख अकाली मृत्यू झालेले थोर समाजसुधारक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, राजकीय आदर्श व्यक्तीविशेष आणि राष्ट्रीय पुरुषांच्या दुःखद वेदना कथन केल्या आहेत. दिवंगत शंकर पांडे यांनाही त्यांच्या प्रारब्ध-संचितानेच काहीसे अकालीच ओढून नेले. ‘मरे एक त्याचा दुजा शोक आहे । अकस्मात् तोहि पुढे जात आहे ।’ श्री समर्थ सांगून गेले, हेच प्रत्येक मानवाने ध्यानी असू द्यावे.
– अधिवक्ता प्रकाश उपाख्य अंबादास देशपांडे, रावेत, पुणे. (१८.११.२०२५)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?