रावळपिंडी (पाकिस्तान) येथील आदियाला कारागृह प्रशासनाने दिली माहिती

रावळपिंडी (पाकिस्तान) – येथील आदियाला कारागृहात पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या करण्यात आल्याच्या वृत्तामुळे २६ नोव्हेंबरला कारागृहाबाहेर खान यांच्या पक्षाचे सहस्रो कार्यकर्ते गोळा झाले होते. इम्रान खान यांच्याविषयी कोणतीही माहिती कारागृह प्रशासन किंवा सरकार यांच्याकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे येथे मोठा तणाव निर्माण झाला होता. आता कारागृह प्रशासनाने या संदर्भात निवेदन प्रसारित करत म्हटले की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती उत्तम असून ते कारागृहातच आहेत.
१. कारागृह प्रशासनाने पुढे म्हटले की, इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दलचे वृत्त निराधार आहे आणि त्यांना सर्व प्रकारचे वैद्यकीय साहाय्य मिळत आहे. ते पूर्णपणे निरोगी आहेत. इम्रान खान यांना आदियाला कारागृहातून कुठेही हालवण्यात आलेले नाही.
२. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, इम्रान यांना पूर्वी कारागृहात जेवढ्या सुविधा मिळत नव्हत्या, त्यापेक्षा अधिक सुविधा पुरवल्या जात आहेत.
३. इम्रान खान भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून गेल्या २ वर्षांहून अधिक काळ कारागृहात आहेत.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य