कॅथॉलिक चर्चमधील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण
(चर्चमध्ये वरच्या श्रेणीत कार्यरत असलेल्या पाद्रयांना ‘बिशप’ म्हणतात.)

माद्रिद (स्पेन) – स्पेनमधील कॅडिज आणि सेउटा धर्मप्रांताचे ७६ वर्षीय बिशप राफेल जोर्नोसा यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे. पोप लियो यांनी त्यांचे त्यागपत्र स्वीकारले आहे. १९९० च्या दशकात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चर्चच्या न्यायाधिकरणाकडून त्यांची चौकशी चालू आहे.
🔥 Shocking Church Abuse Scandal In Spain
Spanish Bishop Rafael Zornoza resigns amidst a sexual abuse case in the Catholic Church. 🇪🇸🙏
The revelations highlight a disturbing reality: many priests, preaching love and peace, are revealed to be "lecherous and perverted."
Is the… pic.twitter.com/1PyaIF5D3O
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 26, 2025
१. व्हॅटिकनने केलेल्या खुल्या तपासाला सामोरे जाणारे ते स्पेनमधील पहिले कॅथॉलिक बिशप ठरले आहेत.
२. पीडित व्यक्तीने त्याच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती ‘डिकॅस्टरी फॉर द डॉक्ट्रिन ऑफ फेथ’ या संस्थेला पाठवलेल्या पत्रात दिली आहे. त्याने नमूद केले आहे की, त्याच्यावर वर्ष १९९४ मध्ये अत्याचाराला प्रारंभ झाला. तेव्हा तो १४ वर्षांचा होता. त्यानंतर ७ वर्षे म्हणजो तो २१ वर्षांचा होईपर्यंत त्याच्यावर बिशपने लैंगिक अत्याचार केले.
३. पीडित व्यक्तीने लिहिले आहे की, रात्री बिशप त्याच्या खोलीत येत असे. तो भयभीत होऊन गप्प बसत असे. ते त्याच्या शेजारी झोपत, त्याच्या गुप्तांगांना स्पर्श करत आणि चुंबन घेत असत. सकाळीही ते त्याच पद्धतीने त्याचे लैंगिक शोषण करत असत.
४. या प्रकरणामुळे कॅथॉलिक चर्चमधील दीर्घकाळ चालत आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रश्नाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
संपादकीय भूमिका
|
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण