
पारितोषिक म्हणजे स्पर्धेत जिंकलेली गोष्ट, तर भेट म्हणजे परतफेडीची अपेक्षा न करता स्वेच्छेने दिलेली गोष्ट ! पारितोषिक स्पर्धेद्वारे मिळवले जाते, तर भेटवस्तू ही सद्भावना, कौतुक किंवा प्रेम यांचे प्रतीक म्हणून दिली जाते. माझ्या एका मित्राने धुलाई यंत्र खरेदी केल्यावर ‘स्क्रॅच गिफ्ट कूपन’वर त्याला ‘लॉयड’ आस्थापनाचे वातानुकूलिन यंत्र भेट मिळाले; पण आस्थापन डिलिव्हरीपूर्वी (वितरित करण्यापूर्वी) ९ सहस्र रुपयांचा ‘टी.डी.एस्.’ (टॅक्स डिडक्शन एट सोर्स – वस्तू देण्यापूर्वी तिथेच भरायचा कर) मागत होते. ही भेट आहे का ? भेटवस्तूची परंपरा लुटमारीच्या व्यवसायात रूपांतरित होत आहे. हे थांबवायला हवे. एका गणेश मंडळाने काढलेल्या लॉटरीवर ‘फॅसिनो’ दुचाकी जिंकलेल्या विजेत्याला गणेश मंडळाने २५ सहस्र रुपयांचा कर भरण्यास भाग पाडले होते.
भारतात पारितोषिकाच्या रकमेवर आणि भेटवस्तूंवर कर वजावट (टी.डी.एस्.) लागू केली जाते; कारण अशा जिंकलेल्या वस्तू आयकर कायद्यांतर्गत उत्पन्न मानल्या जातात. सरकार या वस्तूंवर आगाऊ कर वसूल करण्यासाठी संबंधित स्रोतावर वजावट कर अनिवार्य करते, जे सामान्यतः अनियमित असतात आणि एखाद्या व्यक्तीच्या नियमित कमाईचा भाग नसतात. हा कर किंवा काहीही आयोजकांनी किंवा प्रायोजकांनी भरायला हवा. लाभार्थींनी का भरायचा ? कर भरल्यावर भेटवस्तू किंवा पारितोषिक या शब्दांना मग काय अर्थ रहाणार ?
भेटवस्तू किंवा पारितोषिक मानवी जीवनात चांगले नशीब असल्यास मिळतात, म्हणून भेटवस्तू करपात्र नसावी. जर ती अनिवार्य असेल, तर कायद्यात सुधारणा करा. पारितोषिकाला कर नको, ते केवळ पारितोषिक असावे.
– श्री. राजेश बाणावलीकर, व्हिएगसवाडो, हडफडे, गोवा.
अतिक्रमण, राजकीय संरक्षण आणि प्रशासनाचे अपयश !
देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी हिंदुत्वनिष्ठांचे अभिप्राय !
दैनिक ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्राच्या इतिहासात एक वेगळे आणि दखलपात्र म्हणून चिरकाल स्मरणात राहील !