
भारतीय हवामान विभाग तालुक्यांमध्ये लावलेल्या पर्जन्यमापकांचा वापर करून गोव्यातील पर्जन्यमानाची गणना करतो. स्थानिक शेतकरी या माहितीचा उपयोग पावसाचे अनुमान घेण्यासाठी भात (खरीप) पेरणीचे नियोजन करण्यासाठी आणि शेतातील सिंचनाचे व्यवस्थापन करण्यासाठी करतात; पण या वेळी ‘पर्जन्यमानाचे नैसर्गिक मोजमाप’ शेतकर्यांसाठी अपयशी ठरल्याने यावर्षी मोठे संकट निर्माण होऊ शकते.
सध्याचा पाऊस शेतकर्यांसाठी व्यर्थ ठरत आहे. राज्यात सध्या मॉन्सूनची क्रिया कमकुवत असून बहुतेक भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ आहे आणि केवळ हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. विहिरींचे पाणी भाताच्या वाढीस पुरेसे नाही.
राज्यातील तालुक्यांमध्ये अलीकडील पर्जन्यमान स्थानिक पातळीवर वेगवेगळे आहे. हवामान विभागाच्या अलीकडील अहवालांनुसार गोव्यातील प्रमुख कृषी आणि शहरी हवामान केंद्रांवरील पर्जन्यमानाचे एकूण प्रमाण कृषी कार्यांसाठी पुरेसे नाही. नैऋत्य मोसमी पाऊस जवळजवळ थांबला आहे. मुसळधार पाऊस नसल्यामुळे भाताची लहान रोपे आणि बियाणे सुकून जाऊ नयेत, यासाठी शेतकर्यांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. सातत्यपूर्ण मध्यम पावसामुळे भूमी भिजते, ज्यामुळे भाताच्या रोपांची पुनर्लागवड करणे सोपे होते. ‘पर्जन्यमानाचे गणकयंत्र’ शेतकर्यांसाठी यंदा चुकले असले, तरीही ‘देवाक काळजी रे…माझ्या देवाक काळजी’ (देवाला काळजी रे, माझ्या देवाला काळजी), असे शेतकरी मनातून म्हणतील.
– श्री. राजेश बाणावलीकर, वेगस वाडो, हडफडे, बार्देश, गोवा.
ब्रिटनला आर्थिक डबघाईतून बाहेर काढणारे दूरदर्शी नेतृत्व हवे !
प्रशासकीय अधिकार्यांनी अन्न-औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आदर्श घेऊन कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावी !
देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी हिंदुत्वनिष्ठांचे अभिप्राय !