
१. हिंदु राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी वेळ देण्यासाठी इच्छुक असलेले ह.भ.प. प्रकाश निवळकर महाराज, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

‘ह.भ.प. प्रकाश निवळकर महाराज दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदाते आहेत. त्यांच्या मालकीचे उपाहारगृह आणि सभागृह आहे.
ते वर्ष २०२४ मध्ये फोंडा, गोवा येथे झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला उपस्थित होते. ते ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा लाभलेला सत्संग’ यांमुळे प्रभावित झाले. ते म्हणाले, ‘‘मी माझे उपाहारगृह अन्य कुणाला तरी चालवायला देतो, म्हणजे मला हिंदु राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी वेळ देता येईल.’’
२. प.पू. डॉ. आठवले यांचा सत्संग लाभल्यावर ‘जीवन कृतार्थ झाले’, असा भाव असलेले श्री. कृष्णा पंडित, अध्यक्ष, श्री शारदादेवी देवस्थान, तुरंबव, चिपळूण.

श्री. कृष्णा पंडित हे सातही दिवस वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात उपस्थित होते. त्यांच्या कुटुंबियांनी भ्रमणभाषवरून त्यांची ‘कसे आहात ?’, अशी विचारपूस केल्यावर पंडित यांनी त्यांना सांगितले, ‘‘येथील साधक माझी घरच्यांपेक्षाही अधिक काळजी घेत आहेत.’’ त्यांनी सांगितले, ‘‘मी परम पूज्य डॉक्टरांना आजपर्यंत छायाचित्रात पहात होतो; पण आज त्यांना प्रत्यक्ष भेटून माझे जीवन कृतार्थ झाले.’
– श्री. सुरेश शिंदे (वय ६२ वर्षे), चिपळूण, रत्नागिरी. (७.७.२०२४)
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !