|

बांदिवडे (फोंडा, गोवा), २१ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठा’चे स्वामी प.पू. विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांच्या मंगलहस्ते येथील महालक्ष्मी मंदिर संस्थानाचा इतिहास सांगणार्या पुस्तकाचे २१ नोव्हेंबरच्या सकाळी प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध आधुनिक वैद्य, लेखक आणि मंदिर संस्थानाचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश कामत धाकणकर हे ‘द हिस्ट्री ऑफ श्री महालक्ष्मी टेम्पल बांदिवडे’ या पुस्तकाचे लेखक आहेत. देव दीपावलीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे मंदिराच्या सभामंडपात आयोजन करण्यात आले होते.

या वेळी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष श्री. हर्षद कामत, समितीतील अन्य पदाधिकारी, सौ. नयन अविनाश कामत धाकणकर, सेवक, तसेच देवीचे भक्तगण उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजता देवीची आरती करून उपस्थित शेकडो भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले. संस्थानाच्या वतीने आयोजित महाप्रसादाचाही भक्तगणांनी लाभ घेतला.
उद्घाटन कार्यक्रमाला वास्को मतदारसंघाचे आमदार श्री. कृष्णा (दाजी) साळकर, पत्नी सौ. शमी साळकर, श्री नागेश महारुद्र संस्थान समितीचे पदाधिकारी, महाजन, भक्तमंडळी, तसेच ‘सनातन प्रभात’चे उपसंपादक श्री. उमेश नाईक आणि श्री. विक्रम डोंगरे हेही उपस्थित होते.
संस्थानाचा नूतन भक्तनिवास ‘श्री लक्ष्मी सदन’चेही उद्घाटन !

येथील श्री महालक्ष्मी संस्थानात ‘श्री लक्ष्मी सदन’ या नूतन भक्तनिवासाचे उद्घाटन करण्यात आले. प.पू. विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांच्या वंदनीय उपस्थितीत या नूतन निवास संकुलाचे पूजन झाले. ‘श्री लक्ष्मी सदन’ या फलकाचे अनावरण करून स्वामीजींनी संकुलाचे उद्घाटन केले. या प्रसंगी स्वामीजींनी संकुलातील ‘कॉन्फरन्स हॉल’चेही पूजन केले. या नूतन वास्तूमुळे महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेणारे महाजन, तसेच अन्य भक्त यांच्यासाठी आता एकूण १०० हून अधिक खोल्यांची निवासव्यवस्था झाली आहे.
महालक्ष्मी मंदिराचा वस्तुनिष्ठ इतिहास सांगणारे ‘द हिस्ट्री ऑफ श्री महालक्ष्मी टेम्पल बांदिवडे’ पुस्तक !
|

खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन