चिपळूण, खेड आणि दापोली येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिर विश्वस्तांची शासनाकडे मागणी
(‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ म्हणजे भूमी बळकावण्याच्या विरोधातील कायदा)

चिपळूण – मंदिरे आणि देवस्थाने आपल्या संस्कृतीची अन् श्रद्धेची जागृत केंद्रे आहेत. मंदिरांच्या नित्य पूजा, दिवाबत्ती, वार्षिक उत्सव अविरतपणे चालू रहावेत, या उदात्त हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते सामान्य भाविकांपर्यंत अनेकांनी देवस्थानांना भूमी दान दिल्या आहेत; मात्र आज महाराष्ट्र राज्यातील देवस्थानांच्या भूमी सुरक्षित नाहीत. मंदिरांच्या भूमी बळकावल्याच्या, तसेच प्रशासकीय अधिकार्यांशी संगनमत करून कोट्यवधी किमतीच्या भूमीची कवडीमोल किमतीत विक्री केल्याच्या घटना महाराष्ट्रात उघड होत आहेत. मंदिरांच्या भूमी वाचवण्यासाठी गुजरात आणि कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ लागू करावा, अशा मागणीचे निवेदन मंदिर विश्वस्तांच्या वतीने चिपळूण येथे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना, खेड येथे तहसीलदार सुधीर सोनवणे यांना, तसेच दापोली येथे नायब तहसीलदार सुनील येलवे यांना देण्यात आले.
या कायद्याच्या समर्थनार्थ श्री शारदादेवी देवस्थान, तुरंबव; श्री विंध्यवासिनी देवस्थान, रावतळे; श्री भुलेश्वर मंदिर, फुरुस आणि श्री झोलाई देवस्थान, धामणंद या मंदिरांच्या विश्वस्त आणि ग्रामस्थ यांनी स्वाक्षरी केलेले निवेदन शासनाला देण्यात आले.
चिपळूण येथे निवेदन देतांना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सावर्डे येथील श्री देव केदारनाथ देवस्थानाचे श्री. प्रदीप चव्हाण, भगवान परशुराम देवस्थानाचे श्री. शंकर कानडे, उभळे येथील श्री भैरी-चंडिका देवस्थानाचे अध्यक्ष श्री. बळीराम चव्हाण, श्री अविनाश चव्हाण, श्री अनंत चव्हाण, कूटरे येथील श्री सुकाई-केदार देवस्थानाचे अध्यक्ष श्री. विशाल परकर, कौंढरताम्हाने येथील श्री नवलाई देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. वसंत भोबस्कर, उपाध्यक्ष श्री. सतीश इंदुलकर, श्री. दत्तात्रय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. यशवंत खांडेकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक श्री. सुरेश शिंदे यांच्यासह २५ विश्वस्त आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. उपस्थित मंदिर विश्वस्तांनी आपल्या देवस्थानांच्या लेटरहेडवर कायद्याच्या मागणीची शासनाला निवेदने दिली.
खेड येथे श्री शंकर-पार्वती देवस्थान ट्रस्ट, बिजघरचे खजिनदार श्री. राजारामराव भोसले, श्री. सुनील भोसले, श्री. नारायण भोसले, खोपी येथील श्री जयसिंगराव भोसले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विलास भुवड यांच्यासह मंदिर महासंघाचे सदस्य उपस्थित होते.

दापोली येथे मंदिर महासंघाचे राज्य कोअर कमिटी सदस्य श्री. रमेश कडू, तालुका संयोजक श्री. सुरेश रेवाळे, पाजपंढरी येथील श्रीराममंदिर अन् श्री गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त श्री. काशिनाथ पावसे, श्री. पांडुरंग पावसे, श्री मरीआई देवस्थानाचे अध्यक्ष श्री. मनोज भांबीड, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्रकांत उजाळ, श्री. परेश गुजराथी यांच्यासह अनेक मंदिर विश्वस्त उपस्थित होते.

देवरहाटीविषयी आमचा अभ्यास चालू आहे ! – प्रांताधिकारी आकाश लिगाडेनिवेदनाच्या चर्चेच्या वेळी चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितले की, आम्ही या विषयी गंभीर आहोत. देवरहाटीविषयीही आमचा अभ्यास चालू आहे. मंत्री महोदयांकडून पाठपुरावा चालू आहे. |
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !