
‘सनातन संस्थेचे संस्थापक, रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्र (कलियुगांतर्गत सत्ययुग)’ स्थापन होण्यासाठी सूक्ष्मातून कार्य करणारे, धर्मसंस्थापक, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा ‘रौप्य महोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. गुरुदेवांच्या कृपेने शंखनाद महोत्सव आध्यात्मिक स्तरावर झाला आणि गुरुदेवांनी ‘सनातन राष्ट्र’ निर्माण होण्याचा संकल्प केला.
| पू. शिवाजी वटकर यांचे वय ७९ वर्षे असूनही त्यांचे लिखाण लढाऊवृत्ती असलेल्या एखाद्या तरुणाच्या लिखाणाप्रमाणे आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |

वर्ष १९९६ ते १९९८ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सार्वजनिक सभा होत असत. सभेला सरासरी ५ सहस्र जिज्ञासू आणि साधक उपस्थित असत. त्या वेळी माझी इच्छा होती की, गुरुदेवांची एक सार्वजनिक सभा मुंबई येथील शिवाजी पार्कच्या विशाल (२८ एकर क्षेत्रफळ) मैदानात व्हावी; कारण त्या वेळी अतीप्रतिष्ठित, अतीमहनीय आणि राजकीय नेत्यांच्या सभा या मैदानात होत असत. त्यांच्या सभेला १ – २ लाख लोक उपस्थित रहात असत. मला वाटले की, सर्व राज्यांतील साधक आणि मुंबईतील लोक एकत्रित आले, तर २५ सहस्र श्रोते जमा होऊ शकतात. मी शिवाजी पार्कच्या व्यवस्थापनाकडे, म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडे चौकशी केली. त्यांनी मला ‘तुम्ही मैदानाच्या एका कोपर्यात सभा घेऊ शकता’, असे सांगितले. याविषयी मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आता तेथे सभा नको. पुढे ईश्वरी राज्यात आपल्या मोठ्या सभा होतील.’’ ‘मुंबईतील शिवाजी पार्कवर परात्पर गुरु डॉक्टरांची मोठी सभा व्हावी’, ही माझी सुप्त इच्छा राहिली होती. ती इच्छा आता या गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (२३ एकर क्षेत्रफळ असलेल्या) मैदानात झालेल्या महोत्सवाच्या निमित्ताने पूर्ण झाली. हा महोत्सव २ – ३ घंट्यांचा नसून ३ दिवस होता, तसेच महोत्सवाला भारतासह २३ देशांतील ३० सहस्रांपेक्षा अधिक लोक आले होते. उपस्थितांमध्ये केवळ जिज्ञासू आणि साधक नसून धर्माभिमानी, हिंदुत्वनिष्ठ नेते, पत्रकार, राजकीय नेते, साधक, संत, संप्रदायांचे प्रमुख, अतिमहनीय व्यक्ती इत्यादी होते. यावरून ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे श्रीकृष्णासम धर्माची घडी बसवण्याचे अवतारी कार्य चालू आहे’, हे लक्षात येते.’
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.५.२०२५)
राजकीय पक्षांच्या अन् तत्सम अन्य सभा आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या सभा आणि महोत्सव यांत जाणवलेला भेद !

‘पूर्वी मुंबईतील शिवाजी पार्कवर एकच मोठी सभा घेण्याऐवजी परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ घेण्यास सांगितले. या प्रकारच्या सहस्रो सभा आयोजित केल्या गेल्या. या सभांना १ सहस्र ते २५ सहस्रांपर्यंत जिज्ञासू आणि हिंदु धर्माभिमानी यांची उपस्थिती लाभली. परिणामी भारतभर राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी हिंदूंचे संघटन होत आहे. याचा परिपाक म्हणून आता ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला.
अन्य संघटनांच्या सभा आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या सभा आणि महोत्सव यांत मला जाणवलेला भेद पुढे दिला आहे.
![]() |
![]() |
(वाचण्यासाठी चित्रांवर दोनदा क्लिक करा)
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला समष्टीसाठी वरील सूत्रे सुचवली आणि माझ्याकडून ती लिहून घेतली’, याबद्दल मी त्यांच्या चरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.५.२०२५)
| वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |


एकमेवाद्वितीयत्व असा हिंदु धर्म !
गुरुबोध
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७९ वर्षे) यांचा साधना प्रवास !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असलेल्या आणि शारीरिक त्रासांतही नृत्यकलेतून आनंद मिळवणार्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
साधकांनो, मनातील अनावश्यक विचार न्यून करण्यासाठी प्रयत्न करून साधना आणि सेवा यांची फलनिष्पत्ती वाढवा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !