बिहार विधानसभा निवडणूक

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त) पक्ष यांच्या आघाडीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. यामुळे पुन्हा एकदा या आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे, तर त्याखालोखाल जनता दल (सं.) पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर पुन्हा नितीश कुमार असणार कि भाजपचा मुख्यमंत्री असणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
NDA sweeps Bihar
Results declared show a massive mandate for the alliance.
PM Modi "People of Bihar have voted for a developed and prosperous state by breaking all records”
• BJP emerges as the single-largest party
• Mahagathbandhan suffers a crushing defeat
Seat tally… pic.twitter.com/fg6DwD94cV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 14, 2025
याविषयी कोणतेही अधिकृत विधान दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेले नाही. ‘निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत’, असे घोषित करण्यात आले होते. तसेच केंद्रातील मोदी सरकारला नितीश कुमार यांच्या पक्षाचे समर्थन मिळाल्याने ते टिकले आहे. यामुळेच राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, तरी ‘नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील’, असे म्हटले जात आहे.

२४३ जागांसाठी लढवण्यात आलेल्या या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या नवीनच स्थापन झालेल्या जनसुराज्य पक्षाला खातेही उघडता आलेले नाही, तर काँग्रेस केवळ ४ जागेवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला १९ जागांवर आघाडी मिळाली आहे. या पक्षाचा भाजप-जनता दल (सं.) या युतीला पाठिंबा आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा ए.आय.एम्.आय.एम्. पक्ष (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) ६ जागांवर आघाडीवर आहे. मागच्या वेळीही या पक्षाला इतक्याच जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर यातील ५ जणांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश केला होता.
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक